Thursday, May 14, 2026
Homeदेश विदेशIran US Conflict: युद्धाच्या छायेत इराण: भारतीयांसाठी दुतावासाची महत्त्वाची सूचना जारी

Iran US Conflict: युद्धाच्या छायेत इराण: भारतीयांसाठी दुतावासाची महत्त्वाची सूचना जारी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिका आणि इराण देशांमध्ये कमालीचा तणाव वाढला आहे. यादरम्यान अमेरिका आगामी काळात इराणवर हल्ला करण्याची शक्यता आहे. यादरम्यान भारत सरकारने मोठा निर्णय घेतला असून इराणमधील भारतीय नागरिकांना देश सोडण्याचे आवाहन केले आहे.

इराणची राजधानी असलेल्या तेहरानमधील भारतीय दुतावासाने २३ फेब्रुवारी २०२६ रोजी महत्वाची सूचना जारी केली आहे. या सूचनेत इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना(विद्यार्थी, तीर्थयात्री, व्यापारी आणि पर्यटक) उपलब्ध सर्व साधनांचा, विशेषतः व्यावसायिक विमानसेवेचा वापर करून तातडीने इराण सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विरोध प्रदर्शनं टाळण्याचा, दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा आणि आपली कागदपत्र तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. मदतीसाठी आपातकालीन हेल्पलाइन नंबर आणि दूतावासाच्या संपर्काच विवरण देण्यात आलेय.

- Advertisement -

भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना ओळखपत्रांचे पुरावे तयार ठेवण्यास सांगितले असून दूतावासाच्या संपर्कात रहाण्यास सांगितले आहे. ज्या भारतीयांनी नोंदणी केलेली नाही, त्यांना दूतावासाच्या अधिकृत लिंकवरुन नोंदणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अमेरिकेच्या दोन शक्तीशाली विमानावाहू युद्धनौका अब्राहम लिंकन आणि गेराल्ड फोर्ड या इराण जवळच्या समुद्रात तैनात आहेत.

“१४ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा पुनरुच्चार करण्यात येत आहे की, सर्व भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनी (PIOs) योग्य ती काळजी घ्यावी, निदर्शने किंवा आंदोलने केले जात असलेल्या भागांमध्ये जाणे टाळावे, इराणमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावे आणि सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी स्थानिक प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवावे,” असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आले आहे.

कोणत्याही मदतीसाठी भारतीय दूतावासाने खालील आपत्कालीन संपर्क क्रमांक +989128109115, +989128109109, +989128109102, +989932179359 जाहीर केले आहेत. याशिवाय नागरिक cons.tehran@mea.gov.in या ई-मेलवरही संपर्क साधू शकतात.

Rohit Pawar: तर मराठी माणूस काय ते दाखवून देऊ; अजितदादांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

ही सूचना अशा वेळी जारी करण्यात आली आहे, जेव्हा इराणच्या अणु कार्यक्रमावरून अमेरिका आणि इराणमधील तणाव टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 10 ते 15 दिवसांत नवीन अणु करारासाठी तयार होण्याचा अल्टीमेटम दिला असून, अपयश आल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पेपरफुटीतील मुख्य एजंट राहुरीचा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या पथकाने नाशिक येथील शुभम...