Friday, April 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIran-Israel Conflict: अमेरिकेत खळबळ! परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांच्या घरावर संशयास्पद ड्रोनच्या...

Iran-Israel Conflict: अमेरिकेत खळबळ! परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांच्या घरावर संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, तातडीने स्थलांतराचे आदेश

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इस्रायलच्या सोबतीने अमेरिकेने इराणविरोधात युद्ध पुकारले आहे. इराणकडूनही जोरदार प्रतिकार सुरू आहे. आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ले सुरू आहेत. इराणचे सर्वोच्च नेत्यांसह नेतृत्व पदांवरील नेते-अधिकारी ठार झाले आहेत. इराणने अमेरिकेला निर्वाणीचा इशारा दिला. अशातच अमेरिकेमध्ये एका घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

वॉशिंग्टनमधील सर्वात हायप्रोफाईल अमेरिकी लष्करी तळावर संशयास्पद ड्रोनने घिरट्या घातल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. वॉशिंग्टन पोस्टनुसार, परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि संरक्षण सचिव पीट हेगसेथ हे फोर्ट लेस्ली मॅकनेअर या लष्करी तळावर वास्तव्यास आहेत. याठिकाणी संशयित ड्रोन दिसल्यानंतर अमेरिकन सैन्यात खळबळ उडाली आहे. तातडीने मार्को रुबियो आणि हेगसेथ यांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याचे बोलले जात आहे. परंतु याबाबत अधिकृत माहिती नाही.

- Advertisement -

एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे सुरक्षा सतर्कता आधीच वाढवण्यात आली आहे. परिणामी, लष्कर संभाव्य धोक्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. गेल्या 10 दिवसांत फोर्ट लेस्ली मॅकनेअरवर रात्रीच्या वेळी अनेक ड्रोन दिसले, ज्यामुळे सुरक्षा वाढवण्यात आली आणि व्हाईट हाऊसमध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली. पेंटागनचे मुख्य प्रवक्ते सीन पार्नेल यांनी संरक्षण मंत्री पेट हेगसेथ यांच्या हालचालींबाबत संबंधित कुठलीही माहिती देण्यास नकार दिला. सुरक्षेच्या कारणास्तव ही खबरदारी घेतली जात आहे. त्याशिवाय याप्रकारचे वृत्तांकन करणे बेजबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले. या बैठकीनंतर अमेरिकन सैन्यासाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. इराणकडून होणारा संभाव्य हल्ला पाहता अमेरिकन सैन्याने ही पाऊले उचलली आहेत.

…तर त्या पुरावा नष्ट करतील, ५८ व्हिडीओ म्हणजे ५८ महिलांवर अत्याचार? रुपाली ठोंबरे पाटील यांचा गंभीर आरोप

एअर बेस दोनदा बंद
मॅकडिल एअर फोर्स बेस, जिथे यूएस सेंट्रल कमांड (जी इराणविरुद्धच्या लष्करी कारवायांवर देखरेख करते) कार्यरत आहे, तो देखील या आठवड्यात दोनदा सुरक्षेसाठी बंद करण्यात आला होता. सोमवारी, एक संशयास्पद वस्तू सापडल्यानंतर अभ्यागत केंद्र अनेक तासांसाठी बंद ठेवण्यात आले, बुधवारी, आणखी एका सुरक्षा घटनेमुळे तातडीने स्थलांतराचा आदेश देण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकन अधिकाऱ्यांनी लष्करी तळावर राहण्यास सुरुवात केली आहे.

इराणची अमेरिकेला भीषण बदल्याची धमकी
ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे अनेक वरिष्ठ नेते मारले गेले आहेत. इराणने वारंवार अमेरिकेला ‘भीषण बदल्याची’ धमकी दिली आहे. त्यामुळे हे ड्रोन्स इराणने पाठवले असावेत का, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव रूबियो आणि हेगसेथ यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा विचारही प्रशासनाकडून सुरू आहे.

अमेरिकन दुतावासांना सुरक्षा सतर्कतेचा इशारा
इराणकडून आखाती देशातील दुतावास उद्ध्वस्त केली जात असताना अमेरिकेनं जगभरातील आपल्या दूतावासांसाठी सुरक्षा सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. देशातील अनेक लष्करी तळांवरही सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. न्यू जर्सीमधील जॉइंट बेस मॅकगायर-डिक्स-लेकहर्स्ट आणि फ्लोरिडामधील मॅकडिल एअर फोर्स बेस येथील सुरक्षा पातळी ‘चार्ली’ पर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ हल्ला किंवा धोका अगदी जवळ आला आहे. याच्या वरची एकमेव पातळी ‘डेल्टा’ आहे, जी हल्ला आधीच झाला असेल किंवा अगदी जवळ आला असेल तेव्हा लागू होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कांदा दर घसरण; उपाययोजना सुचविण्यासाठी समिती

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar कांदा बाजारभावातील घसरण व कांद्याबाबत सर्वंकष तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजना यांचा अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी सचिव स्तरीय समिती गठित करण्यात आली...