Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूज...तर त्या पुरावा नष्ट करतील, ५८ व्हिडीओ म्हणजे ५८ महिलांवर अत्याचार? रुपाली...

…तर त्या पुरावा नष्ट करतील, ५८ व्हिडीओ म्हणजे ५८ महिलांवर अत्याचार? रुपाली ठोंबरे पाटील यांचा गंभीर आरोप

पुणे | Pune
नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेल्या कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या व्यक्तीवर कारवाई केल्यानंतर तो स्वतःला ज्योतिष म्हणवून घेत असून त्याच्याकडे अनेक नेतेमंडळी दर्शनासाठी येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा या भोंदूबाबासोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये चाकणकर या अशोक खरातचे पाय धुताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी या प्रकरणात खळबळजनक आरोप केले आहे.

अशोककुमार एकनाथ खरात ऊर्फ कॅप्टन खरात (६७ ) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका ३५ वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी १८ मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. भविष्य बदलण्याचे आमिष दाखवून महिलांची वैयक्तिक अडचण सोडवण्याच्या बहाण्याने तो त्यांचा लैंगिक शोषण करत असल्याचे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणात एकूण ५८ व्हिडिओ समोर आले आहेत. या प्रकरणी आत SIT गठीत करण्यात आली आहे.

- Advertisement -

इस्रायलच्या ‘साऊथ पार्स’वरील हल्ल्याचा सूड; इराणचा कतारच्या जगातील सर्वात मोठ्या LNG प्रकल्पावर भीषण हल्ला

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पदावरून पायउतार झाले पाहिजे
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी आज पत्रकार परिष घेत त्यांनी आरोप केले. यावेळी त्या म्हणाल्या, हा विषय कोणत्या पक्षाचा, जातीचा नाही तर हा विषय महिलांचा आहे. वर्षभरापूर्वी या प्रकरणाची वाचा फोडली होती. ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली निलेश चाकणकर आहेत. त्यामुळे पोलिस कारवाई करत नव्हते का? ५८ व्हिडिओ आहेत. म्हणजे ५८ महिलांवर अत्याचार झाला आहे का? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पदावरून पायउतार झाले पाहिजे. त्याशिवाय या प्रकरणाचा तपास पूर्ण होणार नाही. चाकणकर मॅडम त्या पदावर राहिल्या तर पुरावा नष्ट करणार, असा आरोप त्यांनी केलाय.

तर संपूर्ण राज्यभर आंदोलन करणार
रूपाली ठोंबरे पाटील पुढे म्हणाल्या की, सर्व ट्रस्टवर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. जर रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिला नाही तर संपूर्ण राज्यभर आंदोलन करणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या कानावर हा विषय टाकणार आहे. संविधानिक पदावर असल्यामुळे, तपास योग्य होणार नाही, त्यांनी रुपाली चाकणकर यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे, असे देखील त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Trimbakeshwar Darshan Scam : डिजिटल पुराव्यांच्या चक्रव्यूह; ३०० पानांच्या दोषारोपपत्रातून गैरव्यवहाराचे...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या रॅकेटप्रकरणी पोलिसांनी (Police) न्यायालयात (Court) तब्बल ३०० पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट)...