Thursday, June 18, 2026
Homeदेश विदेशIran-US War: इराण काही शरण येईना! अमेरिकेचा आता थेट 'या' देशांना गर्भित...

Iran-US War: इराण काही शरण येईना! अमेरिकेचा आता थेट ‘या’ देशांना गर्भित इशारा, म्हणाले, सहकार्य करावे, अन्यथा…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इराणने होर्मुजची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जागतिक स्तरावर इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आक्रमक झाले असून त्यांनी मित्रराष्ट्रांना उघडपणे लष्करी हस्तक्षेपाचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की जर मित्र राष्ट्रांनी होर्मुझची सामुद्रधुनी उघडी ठेवण्यास मदत केली नाही तर नाटोचे भविष्य भयानक असू शकते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हंटले आहे की, “आमच्याकडे नाटो नावाची एक व्यवस्था आहे. आम्ही त्यांच्याशी खूप चांगले वागलो आहोत. आम्हाला युक्रेनमध्ये त्यांच्या मदतीची गरज नव्हती. तरीही, आम्ही त्यांना मदत केली. आता ते आम्हाला मदत करतील का ते आम्ही पाहू.” नाटो जगातील सर्वात मोठी लष्करी युती आहे. “आम्ही इराणची लष्करी शक्ती खिळखिळी केली आहे, आता इतर देशांनी आपली युद्धनौका पाठवून सहकार्य करावे, अन्यथा ‘नाटो’चे भविष्य धोक्यात येईल,” असा खळबळजनक इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

- Advertisement -

मागच्या ३ ते ४ दिवसांपासून सतत फोन, कापून टाकू..ठोकून टाकू…शिवसेना नेत्याला धमकीचे फोन

चीनला गर्भित इशारा
त्यांनी असेही म्हटले की जर चीनने होर्मुझची सामुद्रधुनी उघडी ठेवण्यास मदत केली नाही तर ते या महिन्याच्या अखेरीस चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतची शिखर परिषद पुढे ढकलू शकतात. अमेरिकेला या मार्गावरून केवळ १ टक्के तेल मिळते, मात्र चीनसारख्या देशांची ९० टक्के गरज याच मार्गावर अवलंबून आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेने वर्षानुवर्षे या मार्गाचे रक्षण केले आहे, पण आता ज्यांना या तेलाची अधिक गरज आहे, त्यांनी संरक्षणाची जबाबदारी उचलली पाहिजे.

ट्रम्प यांनी चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया आणि ब्रिटनसह ७ देशांकडे युद्धनौका तैनात करण्याची मागणी केली आहे. विशेषतः ब्रिटनवर निशाणा साधताना ट्रम्प म्हणाले, “दोन आठवड्यांपूर्वी ब्रिटन आपली विमानवाहू जहाजे पाठवण्यास कचरत होते. पण जेव्हा अमेरिकेने शत्रूचा खात्मा करून विजय मिळवला, तेव्हा ते मदत करायला तयार झाले. संकटकाळात कोणी मदत केली आणि कोणी पाठ फिरवली, हे अमेरिका लक्षात ठेवेल.” दरम्यान, ऑस्ट्रेलियाने या मोहिमेत सामील होण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

ऑस्ट्रेलियाचा सहभागास नकार
ऑस्ट्रेलियाच्या वाहतूक मंत्री कॅथरीन किंग यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की ऑस्ट्रेलियाने त्यांच्या योगदानाबद्दल आधीच स्पष्ट केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की संयुक्त अरब अमिराती (यूएई) ला मदत करण्यासाठी विमाने पुरवली जात आहेत, विशेषतः या प्रदेशात मोठ्या संख्येने ऑस्ट्रेलियन नागरिक उपस्थित आहे. किंग म्हणाले, “पण आम्ही होर्मुझच्या सामुद्रधुनीत कोणतेही जहाज पाठवणार नाही. आम्हाला माहिती आहे की ते किती महत्त्वाचे आहे. आम्हाला असे करण्यास सांगितले गेले नाही आणि आम्ही त्यात योगदान देत नाही.”

नाटोला शेवटचा इशारा
युक्रेन आणि इतर नाटो देशांना अमेरिका ज्या प्रकारे मदत करते, तशीच मदत आता होर्मुज सुरक्षित ठेवण्यासाठी अपेक्षीत आहे. जर सदस्य देशांनी या आवाहनाकडे दुर्लक्ष केले, तर नाटो संघटनेचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. आखाती देशांनीही (सौदी अरब, युएई) सध्या बचावात्मक पवित्रा घेतल्याने अमेरिकेची डोकेदुखी वाढली आहे.

कोणकोणते देश आहेत नाटो चे सदस्य
संस्थापक सदस्य (1949 मध्ये सामील झालेले 12 देश)
अमेरिका (USA)
युनायटेड किंगडम (UK)
फ्रान्स
कॅनडा
इटली
नेदरलँड्स
बेल्जियम
नॉर्वे
डेन्मार्क
पोर्तुगाल
आइसलँड
लक्झेंबर्ग

नंतर सामील झालेले देश
ग्रीस, तुर्की (Türkiye)
जर्मनी
स्पेन
हंगेरी, पोलंड, चेक प्रजासत्ताक (Czechia)
बल्गेरिया, एस्टोनिया, लॅटव्हिया, लिथुआनिया, रोमानिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया
अल्बानिया, क्रोएशिया
माँटेनिग्रो
उत्तर मॅसेडोनिया
फिनलँड
स्वीडन (हा नाटोचा सर्वात नवीन सदस्य देश आहे)

ताज्या बातम्या

कारवाई

Shivsena Operation Tiger: ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांवर काय कारवाई होणार? खासदारकी राहणार...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्राच्या राजकारणात चार वर्षानंतर पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नऊ खासदारांपैकी सहा खासदार हे बंडखोरी करून वेगळा...