Thursday, January 8, 2026
Homeनाशिकआयर्नमॅन डॉ. सुभाष पवार यांचा माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार

आयर्नमॅन डॉ. सुभाष पवार यांचा माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार

सातपूर। प्रतिनिधी Satpur

गिरीप्रेमी अ‍ॅडव्हेंचर फाऊंडेशन (पुणे)च्या सहकार्याने नाशिकचे आयर्नमॅन डॉ. सुभाष पवार हे एप्रिल महिन्यात जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी सज्ज झाले आहेत. गिरीप्रेमी संस्थेचे गिर्यारोहक तेनजिंग नोर्गे व उमेश झिरपे त्यांना मार्गदर्शन करत आहेत.

- Advertisement -

पुण्यात गिरीप्रेमी संस्थेतर्फे आय.एम.एफ.फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात 350 हून अधिक साहसप्रेमींच्या उपस्थितीत डॉ. पवार यांना भारताचा तिरंगा ध्वज प्रदान करण्यात आला. याप्रसंगी गिरिप्रेमीच्या संस्थापिका अध्यक्षा उषःप्रभा पागे, तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी जीवनगौरव पुरस्कार प्राप्त उमेश झिरपे, एव्हरेस्ट शिखरवीर कृष्णा ढोकले, भूषण हर्षे, आशिष माने, जितेंद्र गवारे आदी उपस्थित होते.

YouTube video player

डॉ. पवार यांनी त्यांच्या वयाच्या 62 व्या वर्षी शारीरिक तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. या दरम्यान त्यांनी धावण्याच्या सरावालाही सुरुवात केली. डॉ. पवार यांनी अनेक मॅरथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, त्यांनी दोन वेळा आयर्नमॅन तर एकदा अल्ट्रामॅन या जागतिक स्तरावरील स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत.

डॉ. पवार हे गिर्यारोहणाचे प्रशिक्षण गिरिप्रेमी अ‍ॅडव्हेंचर फाऊंडेशनच्या माध्यमातून घेत आहेत. गिरीप्रेमी अ‍ॅडव्हेंचर फाऊंडेशनच्या माध्यमातून डॉ. पवार यांनी माऊंट मेरा (21,247 फूट), अन्नपूर्णा सर्किट ट्रेक, एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक आणि आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलीमंजारो (29,341 फूट) यावर यशस्वी चढाई केली आहे. डॉ. पवार यांना गिरीप्रेमी संस्थेतील ज्येष्ठ गिर्यारोहक तेनजिंग नोर्गे, राष्ट्रीय साहसी जीवनगौरव पुरस्कार प्राप्त उमेश झिरपे मार्गदर्शन करत आहेत.

वयाच्या साठीनंतर सहसा ज्येष्ठ नागरिक शरीरातील अनेक व्याधींचा तक्रारी करायला सुरुवात करतात. परंतु डॉ. पवार यांनी हे विधान चुकीचे ठरवून सत्तरी जवळ असताना जगातील सर्वोच्च शिखर चढाईकरीता सज्ज झाले आहेत. डॉ. पवार यांची ही जिद्द फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच नव्हे तर सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
-उमेश झिरपे, ज्येष्ठ गिर्यारोहक


ताज्या बातम्या

Ahilyanagar : रिव्हॉल्वर हलगर्जीपणे हाताळल्याचा ठपका; दोन पोलीस अंमलदार निलंबित

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना सुरक्षा देणारे दोन पोलीस बॉडीगार्ड कर्तव्यात कसूर व शस्त्र हाताळण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहेत....