Monday, July 1, 2024
Homeनाशिकबेजाबदारपणे मांडलेला अर्थसंकल्प- जयंत पाटील

बेजाबदारपणे मांडलेला अर्थसंकल्प- जयंत पाटील

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडला असून हा अर्थसंकल्प म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’ असा आहे. लोकसभा निवडणुकांचा चांगलाच परिणाम राज्यात झालेला दिसत आहे. आता पराभव समोर दिसत असताना, आजच्या अर्थसंकल्पातून शेवटचा प्रयत्न महायुती सरकारने केला आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आजच्या अर्थसंकल्पा बाबत दिली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, हा प्रयत्न देखील तीन महिन्यांसाठी असून आज सादर झालेला अर्थसंकल्प हा बेजबाबदारपणे मांडलेला आहे. निवडणुकीच्या आधी पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करून मग ते वाढवायचे ही पंतप्रधान मोदींची पद्धत राज्यात राबवली गेली आहे. महाराष्ट्राच्या महिलांना तुम्ही आधार देण्याचा प्रयत्न करत आहात तर तो सक्षमपणे करा. फक्त घोषणा करून ठराविक वर्गाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. कसलेही मूल्यमापन न करता हा अर्थसंकल्प सादर झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या