Friday, February 6, 2026
Homeनगरजलसिंचन प्रकल्प मार्गीलावण्यासाठी भरघोस निधी देऊ; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

जलसिंचन प्रकल्प मार्गीलावण्यासाठी भरघोस निधी देऊ; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

नगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचे धोरण महायुती सरकारचे आहे. जिल्ह्यातील दक्षिण आणि उत्तर भागासाठी सुरू असलेले जलसिंचनाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाहिजे, तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जामखेड येथे महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आ. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड, बाजार तळ येथे सभा झाली. यावेळी आ. सुरेश धस, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ही निवडणूक गल्लीतील निवडणूक नसून देशाचा नेता ठरवणारी निवडणूक आहे. या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतो, देशाला कोण विकासाकडे नेवू शकतो आणि सामान्य माणसाच्या आशाआकांक्षा कोण पुर्ण करू शकतो, याचा फैसला करणारी निवडणूक आहे. यामुळे पंतप्रधान पदांची संगीतखुर्ची खेळणार्‍यांच्या मागे जावू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास म्हणत देशाला विकासात पुढे आणले आहे. यामुळे डॉ. विखे यांना मत म्हणजे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत ही जाणीव ठेवा असा सल्ला दिला. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मागील 10 वर्षात पंतप्रधान मोंदीच्या मार्फत झालेल्या कामांचा उवापोह करत इंडी आघाडीचा सडेतोड समाचार घेतला. त्यांनी सांगितले, मोदींकडे विकासाची गाडी असून त्यात महायुतीच्या पक्षांचे डबे आहेत आणि त्यात सर्व सामान्य जनतेला जागा आहे. तर इंडीकडे केवळ इंजिन आहेत आणि इंजिनमध्ये कुणाला जागा नाही.

YouTube video player

काँग्रेसच्या काळात ऊस शेतकर्‍यांवर 10 हजार कोटी रुपयांचा इनकम टॅक्स होता. पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यावर त्यांनी कायदा बदलून हा टॅक्स रद्द करून शेतकर्‍यांना दिलासा दिला. त्याच बरोबर मोदी सरकार च्या माध्यमातून शेतकर्‍यांना 24 तास वीज दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. विखे यांनी मागील पाच वर्षात जिल्ह्यात विकासाची भरगोस कामे केली आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रकारचा दुष्काळ कमी करण्यासाठी त्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. येणार्‍या काळात सुजय विखेंच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा दुष्काळ आपल्याला संपवायचा आहे. यामुळे येत्या 13 तारखेला कमळ चिन्हाचे बटण दाबून सुजय विखे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. सुजय विखे पाटील, वाघ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

ताज्या बातम्या

महापौरपदी

Nashik News: मोठी बातमी! नाशिकच्या महापौरपदी हिमगौरी आडके-आहेर तर उपमहापौर पदी...

0
नाशिक | प्रतिनिधीनाशिक महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी (दि. ६) निवडणूक पार पडली असून, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर कुंभनगरीच्या १७ व्या महापौर पदावर भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके...