दिल्ली | Delhi
भारत आणि चीन मधील तणाव सध्या वाढतच आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी काही दिवसापासून सरकारला वेगवेगळ्या मुद्द्या वरुन घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांची आज ट्विट करत त्यांच्यावर टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी म्हंटले आहे की, “चीनने घुसखोरी करून भारताची भूमी बळकावली आहे. ही बळकावलेली जमीन परत मिळवण्यासाठी भारत सरकार नेमकी काय योजना आखत आहे.” तसेच “की ही गोष्ट सुद्धा अॅक्ट ऑफ गॉड म्हणून सोडून दिली जाईल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
आज भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली
दरम्यान आज LAC मधील तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली. सीमेवरील तणाव संपुष्टात आणण्यासाठी भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (Foreign Minister S Jayshankar) आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी (Chinese Foreign Minister Wang Yi) यांच्यात बैठकीमध्ये 5 मुद्द्यांवर सहमती झाली.
या मुद्द्यांवर सहमती
– दोन्ही देशांचं सैन्य विवादित क्षेत्रातू वापस घ्यावं.
– आपापसातील मतभेदांचे वादात रुपांतर होऊ देणार नाही.
– निश्चित धोरणानुसार दोन्ही देशांमधील चर्चा सुरु ठेवावी.
– सध्याच्या संधी आणि प्रोटोकॉल्स दोन्ही देश मानणार.
– तणाव वाढेल असे कोणतेही पाऊल दोन्ही देश उचलणार नाही.
अजूनही वातावरण तणावपूर्ण !
दोन्ही देशात लष्कर पातळीवर चर्चा सुरु असाताना दोन्ही देशाचे रणगाडे एकमेकांच्या फायरिंग डिस्टन्समध्ये (शत्रूवर तोफगोळ्यांचा मारा करता येईल एवढ्या अंतरावर) आले आहेत. चीनचे रणगाडे आणि शस्त्रसज्ज वाहनं कालाटोप डोंगराच्या पायथ्याथी तैनात करण्यात आली आहेत. हा भाग भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे.