Monday, April 6, 2026
Homeदेश विदेशMiddle East Crisis: इस्राईल-इराणमध्ये युध्दाला तोंड फुटलं; भारतीयांसाठी तातडीच्या मार्गदर्शक सुचना जारी

Middle East Crisis: इस्राईल-इराणमध्ये युध्दाला तोंड फुटलं; भारतीयांसाठी तातडीच्या मार्गदर्शक सुचना जारी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्व परिस्थितीनंतर अखेरीस आज इराणमध्येयुद्धाला तोंड फुटले आहे. आज सकाळपासून इस्राइलने इराणची राजधानी असलेल्या तेहरामध्ये मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला आहे. या हल्ल्यांमुळे तेहरानमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटांचे आवाज येत असून, आकाशामध्ये सगळीकडे काळा धूर पसरला आहे.

इस्राईलच्या संरक्षण मंत्र्यांनी या हल्ल्यांना दुजोरा दिला आहे. तसेच प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे इस्राइलकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे इराणवरील या हल्ल्य्यानंतर इराणकडून होणाऱ्या प्रतिहल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन इस्राइलमध्ये युद्धाचे बिगुल वाजू लागले आहे. तसेच इस्राइलमध्ये शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहे. तसेच लोकांना सुरक्षितस्थळी आश्रय घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

- Advertisement -

इराणची राजधानी तेहरानमध्ये शनिवारी मोठा स्फोट झाला. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयाजवळ हा हल्ला झाला असून यावेळी ८६ वर्षीय खामेनी यावेळी कार्यालयात होते की नाही याबाबत स्पष्टता झालेली नाही. दरम्यान, या दोन्ही देशांत तणाव वाढत असताना इस्रायलमधील भारतीय राजदूतांनी भारतीयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला
“प्रदेशातील सद्य सुरक्षा परिस्थिती पाहता, इस्रायलमधील सर्व भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आणि सदैव सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. भारतीय नागरिकांना इस्रायली अधिकारी आणि ‘होम फ्रंट कमांड’द्वारे जारी केलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.अद्ययावत सूचना या संकेतस्थळावर पाहता येतील: https://www.oref.org.il/eng”, असे भारतीय दूतावासाने म्हटले आहे.

“सर्व भारतीय नागरिकांनी नियुक्त केलेल्या आश्रयस्थानांच्या जवळ राहावे आणि आपल्या निवासस्थानी किंवा कामाच्या ठिकाणी असलेल्या जवळच्या सुरक्षित जागांची माहिती करून घ्यावी. भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत इस्रायलमध्ये सर्व अनावश्यक प्रवास टाळावा. नागरिकांनी स्थानिक बातम्या, अधिकृत घोषणा आणि आपत्कालीन सूचनांवर नियमितपणे लक्ष ठेवावे. कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत, भारतीय नागरिक तेल अवीवमधील भारतीय दूतावासाशी +972-54-7520711 किंवा ई-मेल: cons1.telaviv@mea.gov.in या २४x७ हेल्पलाइनद्वारे संपर्क साधू शकतात”, असंही भारतीय दूतावासाने म्हटलं आहे.

Middle East Crisis : मोठी बातमी! इस्रायलचा इराणच्या राजधानीवर थेट हल्ला, आकाशात धुराचे लोट पसरले

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अजय बागूलसह तिघांना हायकोर्टाकडून जामीन

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरात खळबळ उडवून देणाऱ्या विसे मळा गोळीबार आणि अपहरण प्रकरणातील (Firing Case) संशयितांना अखेर दिलासा मिळाला आहे. भाजप नेते सुनील...