Friday, May 3, 2024
Homeजळगाववाघळी ग्रामपंचायतीच्या शिरपेचात आय.एस.ओ. मानांकनाचा तुरा

वाघळी ग्रामपंचायतीच्या शिरपेचात आय.एस.ओ. मानांकनाचा तुरा

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील वाघळी गावात चांगल्या पद्धतीच्या मुलभूत सुविधा पुरविल्यामुळे वाघळी आय.एस.ओ. नामांकन प्राप्त झाले आहे. नामांकन मिळविण्यासाठी…

- Advertisement -

गावाने जलसंधारण, शुद्ध पाणी, वृक्ष लागवड, ग्रामपंचायतीचे आताचे दफ्तर, गावाचे रस्ते, अंगणवाडी, शैक्षणिक सेवा सुविधा, पाणी पुरवठा, आरोग्य अशा विविध क्षेत्रात सर्व पायाभूत सुविधा ग्रामपंचायतीने निर्माण करून दिल्या नंतर आय.एस.ओ. नामांकना साठी ग्रामपंचायतीने प्रयत्न केले असता, या नामांकनासाठी संबंधीत संस्थेच्या चमूने सर्वेक्षण केले.

त्यानंतर जळगाव जिल्ह्यात वाघळी ग्रामपंचायतीला नुकतेच जळगावचे आमदार व वाघळी गावाचे सुपूत्र राजू मामा भोळे यांच्या हस्ते आय.एस.ओ नामांकनाचे पत्र देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी दिपक सुर्यवंशी भा.ज.पा. जळगाव महानगर अध्यक्ष, अविनाश सुर्यवंशी, प्रभाकर सोनवणे, गणेश माळी, ग्रा.प. सदस्य भास्कर बेडीस्कर, समाधान महिरे, विजय भंगाळे, ग्रामविकास अधिकारी जितेंद्र लोणीया, पो.पाटील जयश्री बर्हाटे, गिरीश बर्हाटे, निलेश सोनगीरे, ज्ञानेश्वर शिन्दे, धनंजय सुर्यवंशी, जगदिश कुमावत आदि उपस्थितीत होते.

प्रतिक्रिया-

ग्रामस्थांच्या सहकार्यमुळे गेल्या पाच वर्षात विकासाची काम चालू आहे. आय.एस.ओ.नामांकन मिळाल्यामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा लागला असून चांगल्या कामाची पावती मिळाली आहे. पुढे देखील गावाच्या विकासासाठी आशाच पद्धतीने ग्रामस्थांच्या व सर्व सदस्यांच्या सहकार्याने गावाचा विकास केला जाईल. वाघळी गावाला तालुक्यातील नव्हे, तर जिल्ह्यातील आदर्श गाव करण्याचा यापुढे प्रयत्न राहील.

विकास चौधरी, सरपंच-वाघळी

- Advertisment -

ताज्या बातम्या