Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशIsrael-Hamas War : नागरिकांची कत्तल करणारा हमासचा कमांडर ठार, दहशतवादी संघटनेचं मुख्यालय...

Israel-Hamas War : नागरिकांची कत्तल करणारा हमासचा कमांडर ठार, दहशतवादी संघटनेचं मुख्यालय उद्ध्वस्त

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेतील युद्धाला (Israel And Palestine War) आता आठ दिवस झाले आहेत. हमासच्या दहशतवाद्यांनी गेल्या शनिवारी (७ ऑक्टोबर) गाझापट्टीतून इस्रायलवर शेकडो क्षेपणास्रे डागली. या युद्धात आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. तर १० हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, इस्रायली सशस्त्र दलाला एक मोठे यश मिळाले आहे. इस्रायली वायूदलाने हमासच्या कमांडरला ठार केले आहे.

- Advertisement -

इस्रायली सैन्याने शनिवारी रात्री हवाई हल्ल्यात दक्षिण खान युनिस बटालियनमधील नहबा फोर्सचा टॉप कमांडर बिलाल अल-कदरा याला ठार केले आहे. मारला गेलेला दहशतवादी इस्रायलमधील अनेक लोकांच्या हत्येला जबाबदार होता. त्यानेच दक्षिण इस्रायलच्या किबुत्झ निरीम आणि निरोज भागातील घरांमध्ये घुसून लोकांचा शोध घेतला आणि त्यांची हत्या केली.

Israel Attack Gaza : लष्करी हालचालींना वेग! गाझातील नागरिकांना ३ तासांची डेडलाईन

घरातील एकही व्यक्ती जिवंत राहणार नाही यावर त्याचा भर असायचा. त्यामुळे त्याच्या बद्दलची नागरिकांमध्ये दहशत होती. लोक त्याला घाबरायचे. हमाससारख्या दहशतवादी संघटनेत काम करतानाच तो पॅलेस्टाईनच्या इस्लामिक जिहाद संघटनेतही सक्रिय होता. अखेर त्याला मारण्यात इस्रायलला यश आले आहे.

गाझा पट्टीत एअर स्ट्राईक केल्यानंतर इस्रायल डिफेन्स फोर्सने एका निवेदनाद्वारे सांगितले की आयडीएफने जेयतून, खान युनिस आणि पश्चिम जाबलियाच्या आसपासच्या प्रदेशातील हमासच्या तळांवर हल्ला केला.

“दादांवर आरोप! आता फडणवीस, ED…”; संजय राऊतांची खोचक टीका

या काळात पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनेचे लष्करी मुख्यालयही उद्ध्वस्त करण्यात आले यासोबत इस्लामिक जिहाद परिषदेचं कार्यालय, कमांड सेंटर, सैन्य परिसर, डझनभर लाँचर पॅड, अँटिक पोस्ट आणि वॉच टॉवर इस्रायलने नेस्तनाबूत केला आहे. या एअरस्ट्राईकमध्ये पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद दहशतवादी संघटनेच्या सैन्य मुख्यालयालाही नष्ट करण्यात आलं आहे. आयडीएफने हमासच्या अनेक वास्तू उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे हमासचं कंबरडं मोडले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या