Monday, June 24, 2024
Homeमुख्य बातम्याइस्रोच्या अध्यक्षांनी आत्मचरित्राचं प्रकाशन केलं रद्द; कारण काय?

इस्रोच्या अध्यक्षांनी आत्मचरित्राचं प्रकाशन केलं रद्द; कारण काय?

दिल्ली | Delhi

- Advertisement -

इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी त्यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन रद्द केलं आहे. या आत्मचरित्रात इस्रोचे माजी अध्यक्ष के. सिवन यांच्याबाबत कथित टिप्पणी केली असल्याचा दावा करून वाद निर्माण झाला होता. मात्र, आता त्यांनी प्रकाशन रद्द केलं असल्याची माहिती दिली आहे.

चांद्रयान ३ मोहिमेच्या यशस्वीतेनंतर इस्रोचे अध्यक्ष ए. सोमनाथ चर्चेत आहेत. त्यांचं ‘निलावू कुडीचा सिंहगल’ हे मल्याळम भाषेतील आत्मचरित्र पुढच्या आठवड्यात प्रकाशित होणार होते. परंतु, या आत्मचरित्राचं प्रकाशन त्यांनी थांबवलं आहे. या आत्मचरित्रात के. सिवन यांच्यावर टीका करण्यात आल्याचा दावा अनेकांकडून करण्यात आला. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. परिणामी त्यांनी प्रकाशन मागे घेतले. एस. सोमनाथ यांची इस्रोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याकरता के. सिवन (इस्रोचे माजी अध्यक्ष) यांनी हस्तक्षेप केला होता, असा दावा या पुस्तकातून करण्यात आल्याचा आरोप केला जातोय. पुस्तक प्रकाशनाआधीच प्रकाशकांनी पुस्तकाच्या प्रती कोणाला तरी दिल्या असल्याने हा वाद निर्माण झाला आहे.

एस सोमनाथ म्हणाले की, कुठल्याही संघटनेत स्वतःचं स्थान निर्माण करणे आणि त्यामध्ये वरीष्ठ पदांवर झेप घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. असे अडथळे सर्वांच्या आयुष्यात येतात. सोमनाथ म्हणाले की, माझा उद्देश कोणत्याही व्यक्तीवर अरोप करणे हा नव्हता तर अशा प्रकारच्या घटना घडतात हे सांगण्याचा होता. ते असेही म्हणाले की, या पुस्तकाचा मुख्य उद्देश जीवनाची कथा सांगणे हा नसून लोकांना समस्यांचा सामना करणे आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्याकरिता प्रेरणा देणे हा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या