नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी आज (2 नोव्हेंबर 2025) ऐतिहासिक दिवस आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने भारतीय नौदलासाठी तयार केलेला CMS-03 (GSAT-7R) कम्युनिकेशन सॅटेलाईटचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले. हा उपग्रह नौदलाचा आतापर्यंतचा सर्वात प्रगत उपग्रह आहे. यामुळे नौदलाच्या अवकाश-आधारित संप्रेषण आणि अत्याधुनिक लष्करी सॅटेलाईट ठरले आहे.
हे सॅटेलाईट इस्रोच्या ‘बाहुबली रॉकेट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या LVM3-M5 रॉकेटद्वारे श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सायंकाळी 5:26 वाजता अवकाशात सोडण्यात आले.
GSAT-7R हा एक संप्रेषण उपग्रह आहे, म्हणजेच तो संप्रेषणाचे माध्यम म्हणून काम करेल. तो पूर्णपणे भारतात डिझाइन आणि बांधण्यात आला आहे. हा उपग्रह नौदल जहाजे, विमाने, पाणबुड्या आणि सागरी ऑपरेशन केंद्रांमध्ये जलद आणि सुरक्षित संप्रेषण प्रदान करेल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात वजनदार संप्रेषण उपग्रह आहे. अंदाजे ४,४०० किलोग्रॅम वजनाचा, यात नौदलाच्या गरजांसाठी विशेषतः डिझाइन केलेले अनेक स्वदेशी घटक आहेत. हे आत्मनिर्भर भारताचे एक उत्तम उदाहरण आहे, जिथे आपण आपल्या स्वतःच्या तंत्रज्ञानाद्वारे शक्ती मिळवत आहोत. हे उपकरण आवाज, डेटा आणि व्हिडिओ कम्युनिकेशन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी बँड्सवर सक्षमपणे हाताळतील.
या कारणांसाठी हे सॅटेलाईट विशेष ठरणार
वजन आणि आकार: या सॅटेलाईटचे वजन ४४०० किलोग्रॅम असून आत्तापर्यंतचे सगळ्यात अत्याधुनिक कम्युनिकेशन असलेला सॅटेलाईट असणार आहे. या पूर्वीचे सॅटेलाईट वजनाने हलके असत.
ट्रान्सपोंडर्स: व्हॉइस, डेटा आणि व्हिडिओ लिंकसाठी विविध बँड्सवर सक्षम
कव्हरेज एरिया: संपूर्ण हिंद महासागर प्रदेशात स्थिर व मजबूत सिग्नल
हाय बँडविड्थ कनेक्टिव्हिटी: नौदलाच्या जहाजांपासून नियंत्रण केंद्रांपर्यंत अखंड व सुरक्षित डेटा ट्रान्सफर
दीर्घकालीन कार्यक्षमता: अनेक वर्षे अवकाशात सक्रिय राहण्याची क्षमता
भारतीय नौदलासाठी हे का महत्त्वाचे आहे?
आज सागरी सुरक्षेच्या आव्हानांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. चीन आणि पाकिस्तानसारख्या शेजारी देशांमुळे हिंदी महासागरात तणाव कायम आहे. GSAT-7R मुळे नौदलाला अंतराळातून देखरेख करण्यास आणि जलद प्रतिसाद देण्यास सक्षम केले जाईल. नौदल प्रमुखांनी म्हटले आहे की हा उपग्रह देशाच्या सागरी हितांचे रक्षण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




