Monday, May 27, 2024
Homeदेश विदेशChandrayaan 3 ने पाठवला चंद्राचा पहिला व्हिडीओ; ‘ऑर्बिट रिडक्शन’ प्रक्रिया यशस्वी

Chandrayaan 3 ने पाठवला चंद्राचा पहिला व्हिडीओ; ‘ऑर्बिट रिडक्शन’ प्रक्रिया यशस्वी

दिल्ली | Delhi

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO ने चांद्रयान 3 मोहिमेअंतर्गत रविवारी महत्वाची प्रक्रिया पार पाडली. चांद्रयान ३ ने रविवारी रात्री ११ वाजता ‘ऑर्बिट रिडक्शन’ प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असून हे यान चंद्राच्या आणखी जवळ गेले आहे. या यानाने पहिला पहिला फोटो आणि व्हिडिओ इस्रोला पाठवला. हा व्हिडिओ आणि फोटो इस्रोने ट्विटर पेजवर प्रसिद्ध केला आहे.

- Advertisement -

चंद्राच्या कक्षेत पोहोचताच Chandrayaan-3 चा अनोखा संदेश, “मी चंद्राचे…”

चांद्रयान आता चंद्राभोवती 170×4313 किलोमीटर कक्षेमध्ये फिरत आहे. हे चांद्रयान आता या कक्षेमध्ये चंद्राभोवती फेरी मारणार असून ९ ऑगस्ट रोजी ते इस्रोच्या बंगळुरु येथील सेंटर वरुन आणखी आतल्या कक्षेत पुढे पाठवले जाईल. रविवारी रात्री ११ वाजता चांद्रयान ३ ने ‘ऑर्बिट रिडक्शन’ प्रक्रिया पार पाडत बंगळुरु येथील सेंटरमध्ये इस्रोने दिलेल्या कमांडप्रमाणे चांद्रयान ३ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. यानंतर यानाने चंद्राचे फोटो आणि व्हिडिओ इस्रोला पाठवले असून हे फोटो आणि व्हिडिओ इस्रोने ट्विटर पेजवरुन प्रसारित केले.

आता २३ ऑगस्ट ही भारताच्या चांद्रयानसाठी सर्वात महत्त्वाची तारीख आहे. या दिवशी त्याला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करायचे आहे. गेल्या वेळी भारताचे चांद्रयान २ या टप्प्यावर अयशस्वी झाले होते. पण आता चांद्रयान ३ पूर्ण तयारीनिशी चंद्राकडे वाटचाल करत आहे. मागील चुकांमधून धडा घेत यावेळी ५००×५०० मीटरच्या छोट्या जागेऐवजी, लँडिंग साइटसाठी ४.३ किमी x २.५ किमीची मोठी जागा निवडली आहे. म्हणजेच यावेळी लँडरला अधिक जागा मिळेल आणि तो सॉफ्ट लँडिंग सहज करू शकेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या