Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजस्कूल व्हॅन नियमावलीची अधिसूचना जारी करा - परिवहन मंत्री सरनाईक यांचे निर्देश

स्कूल व्हॅन नियमावलीची अधिसूचना जारी करा – परिवहन मंत्री सरनाईक यांचे निर्देश

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन नियमावली आणण्यात येत आहे. ही नियमावली अंतिम करून याबाबत तातडीने अधिसूचना जारी करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी दिले.

- Advertisement -

या नियमावलीमध्ये परिवहन समित्यांचे सक्षमीकरण, महिन्यातून एकदा समितीची बैठक होणे, प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नोडल अधिकारी नेमणे अंतर्भूत असावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

YouTube video player

प्रताप सरनाईक यांनी आज परिवहन आयुक्त कार्यालयात स्कूल व्हॅनच्या संदर्भात बैठक घेतली. या बैठकीत स्कूल व्हॅनबाबत सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी बोलताना सरनाईक म्हणाले, अत्याधुनिक सुरक्षा आणि सुविधांनी युक्त असलेली अधिकृत स्कूल व्हॅन विद्यार्थ्यांना उपलब्ध होण्यासाठी आधीच्या नियमात बदल करण्यात येऊन नियमावली सुटसुटीत करावी. स्कूल व्हॅनचे भाडे मासिक तत्वावर आणि वर्षाच्या १० महिने कालावधीपर्यंतच घेण्याबाबत बंधन असावे.

देशात सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी केंद्र सरकारने स्कूल बस नियमावलीचा आधार घेऊन अद्यावत मानके अर्थात स्कूल व्हॅन नियमावली तयार केली आहे. चारचाकी १२+१ आसनापर्यँत विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी वाहनाला शालेय व्हॅनचा दर्जा देण्यात येणार आहे. वाहने बीएस -६ या श्रेणीतील असतील. यात चालक ओळखपत्र, आपत्कालीन निर्गमन, वाहन प्रवेश, स्टोरेज रॅक यांच्या स्पष्टतेसह आसन रचना, अग्निशमन अलार्म यंत्रणा, वाहन ट्रॅकिंग अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा ही समावेश असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

स्कूल बस भाडे परवडत नसलेले पालक विद्यार्थ्यांसाठी अनेकदा अवैध रिक्षाचा पर्याय अवलंबतात. रिक्षाच्या तुलनेत व्हॅनमध्ये अधिक सुरक्षेची तरतूद आहे. व्हॅनचे दरवाजे बंद असतात. व्हॅनमध्ये शाळेची बॅग, पाण्याची बाटली आणि अन्य साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी जागा असते, असेही सरनाईक म्हणाले. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर, अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत कळसकार, सह परिवहन आयुक्त जयंत पाटील आदी उपस्थित होते.

अशी असेल स्कूल व्हॅन
जीपीएस यंत्रणा,
सीसीटीव्ही आणि डॅशबोर्डवर स्क्रीन,
अग्निशमन अलार्म प्रणाली,
दरवाजा उघडा राहिल्यास अलार्म यंत्रणा,
ताशी ४० वेगमर्यादेसह स्पीड गव्हर्नर,
पॅनिक बटण,
आपत्कालीन दरवाजे,
स्कूल व्हॅनमध्ये लहान विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पायरी,
गाडीच्या छतावर शाळेचे नाव

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...