Friday, May 3, 2024
HomeUncategorizedविविध आस्थापनांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित

विविध आस्थापनांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित

ओैरंगाबाद – aurangabad

कोविड-19 विषाणूच्‍या संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरण करणे आवश्यक आहे. राज्यातील Covid-19 लसीकरणाचे प्रमाण 74% असून, औरंगाबाद जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण केवळ 64% एवढे आहे. हे प्रमाण राज्याच्या टक्केवारीच्या तुलनेत अत्यंत कमी असून आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेता, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे अपेक्षित आहे, जेणेकरुन Covid-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेस प्रभावीपणे आळा घालता येणार आहे. ही बाब लक्षात घेऊन  जिल्ह्यातील विविध आस्थापणांमधील कार्यरत मनुष्‍यबळ, चालक/मालक इत्‍यादी व्‍यक्तिंचे लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.

- Advertisement -

या आस्थापनांमध्ये मेडीकल, कॉस्‍मेटीक व सौंदर्य प्रसाधनांची उत्‍पादने करणा-या कंपन्‍या, औषध निर्माते/कंपन्‍या तसेच अॅलोपॅथीक, होमिओपॅथीक, आयुर्वेदीक इत्यादी तत्‍सम सर्व प्रकारच्‍या आस्थापना, ब्‍लडबॅंक, हॉटेल्स किराणा मालाची दुकाने ,बहु-उत्पादन विक्री दुकाने (Multi Product Selling Shops) सर्व प्रकारची दुकाने आस्थापना, रेस्टॉरन्ट्स, भोजनालय, ढाबे, खानावळी, इत्यादी खाद्यसेवा देणाऱ्या आस्थापना, जिल्‍ह्यातील सर्व मद्यविक्री दुकाने , वाईन/बिअर शॉपी, देशी दारु दुकाने, FL3 अनुज्ञप्‍ती धारक विक्रीचे ठिकाणे इ चा समावेश आहे. सदरचा आदेश 25 नोव्हेंबरपासून लागू करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

मार्गदर्शक सूचना

1) जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मेडीकल, कॉस्‍मेटीक उत्‍पादने तयार करणा-या कंपन्‍या/आस्‍थापना, ब्‍लडबॅंक, औषध निर्माते/ कंपन्‍या तसेच अॅलोपॅथीक, होमिओपॅथीक, आयुर्वेदीक इत्यादी तत्‍सम सर्व प्रकारच्‍या आस्थापनेतील व्‍यवस्‍थापकीय यंत्रणेतील सदस्‍य /अधिकारी व्‍यवस्‍थापक, कामगार, तसेच इतर राज्‍यातून नजीकच्‍या काळात रुजू झालेले इतर राज्‍यातुन आलेले कामगार, इतर गावी निवास असलेले व ये-जा (Up-Down-Travel) करणारे कामगार व इतर कार्यरत मनुष्‍यबळ, मेडिकल्‍स आस्‍थापना संबंधी चालक/मालक इत्‍यादी व्‍यक्तिंचे लसीकरण अनिवार्य असेल. औषधी मालाचे बहु-उत्पादन विक्री दुकाने (Multi Product Selling Shops), इत्यादी, सर्व प्रकारची दुकाने आस्थापना मध्ये कार्यरत सर्व मनुष्यबळ यांच्‍या कोविड-19 प्रतिबंधात्‍मक लसीकरणाच्‍या दोन मात्रा पूर्ण झाल्‍याची खातरजमा संबंधित आस्थापनाचे मालक/ प्रमुख यांनी करावी. कोविड प्रतिबंधात्‍मक लसीकरण पूर्ण झाल्‍याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित मालकाने त्यांच्या अधिनस्त मनुष्यबळ व कामगारांकडून प्राप्‍त करुन घ्‍यावे. ज्या कार्यरत कामगारांचे, मनुष्यबळाचे लसीकरणासाठी काही अडचण असल्‍यास नजीकच्‍या लसीकरण केंद्रात जावे किंवा लसीकरणाचे विषेश सत्र आयोजित करावे, जेणेकरुन सर्व दुकान मालक व विक्री कामगार वर्ग यांचे लसीकरण पूर्ण होईल याची खातरजमा करावी.

2) ‍जिल्ह्यात अधिक जोमाने लसीकरणाची उद्दिष्टपूर्ती व्हावी यादृष्टिने लसीकरण वृद्धींगत करण्यामध्ये सामाजीक जबाबदारी म्हणून सहभाग नोंदवावा.

3) उपायुक्त औषध प्रशासन अंतर्गत नोंदणीकृत सर्व उपरोक्त नमुद आस्थापनाच्या ठिकाणी उपायुक्त औषध प्रशासन कार्यालया मार्फत वेळोवेळी तपासणी करण्यात येईल व ज्या ठिकाणी ‍कर्मचारी, कामगार व कार्यरत मनुष्यबळाची लसीकरणाची किमान 01 मात्रा (Dose) देखील पूर्ण झालेली नसल्याचे आढळुन आल्यास सदर आस्थापना/दुकाने दंडात्मक कारवाईसह Seal करण्यात येतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या