Saturday, May 18, 2024
Homeनगरजागरूक नागरिक मंचाचे स्वातंत्र्यदिनी अनोखे आंदोलन

जागरूक नागरिक मंचाचे स्वातंत्र्यदिनी अनोखे आंदोलन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वाढत्या राक्षसी महागाईमुळे (Rising monstrous inflation) नागरिक ग्रासले आहेत. याचा निषेध (Protests) नगरच्या जागरूक नागरिक मंचच्या (Jagruk Nagarik Manch) वतीने स्वातंत्र्यदिनी करत अनोखे आंदोलन (Movement) केले. महागाईमुळे (Inflation) लवकरच टांगा युग पुन्हा येणार असल्याने दिल्लीगेट (Delhigate) येथे शहरातील एकमेव टांग्यासह स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव (Amrut Mahostav) व महागाईचा सुवर्ण मोहत्सव, आकाशाला भिडलेली महागाई आवारा असा फलक लावलेले फुगे आकाशात सोडण्यात आली. जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे (Suhas Mule) यांच्या संकालापानेतून हे अनोखे आंदोलन (Movement) करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांना भारत माझा देश… आहे, या प्रतिज्ञेप्रमाणे नगर शहर माझे शहर आहे अशी…, अशी शपथ व प्रतिज्ञाद्वारे जनजागृती करण्यात आली. व्हीआरडीई मधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रमोद देशपांडे यांच्या हस्ते शेकडो नागरिकांना छापील प्रतिज्ञा वाटण्यात आल्या. यावेळी मुळे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी देखील अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत विरोधात सामान्य जनतेला जर टोकाचा संघर्ष करावा लागत असेल तर निश्चितच खेदाची बाब आहे.

त्यातच दोन वर्षांपासून लॉकडाउनमध्ये (Lockdown) होरपळून निघालेल्या सामान्य माणसाचा महागाई (Inflation) टाहो मायबाप सरकार पर्यंत पोहचवणे आवश्यक असल्याने गॅसच्या फुग्यांद्वारे हा संदेश उंच बसलेल्या बेखबर सरकार कडे पाठवत आकाशात सोडण्यात आले आहेत. यावेळी सुनील पंडित, बाळासाहेब भुजबळ, कैलास दळवी, माजी महापौर भगवान फुलसौंदर, यांचीही भाषणे झाली. मंचचे सचिव कैलास दळवी, सदस्य राजेंद्र पडोळे, राजेंद्र टकले, योगेश गणगले, अमृत बोरा, प्रमोद देशपांडे, दत्ता गायकवाड, अमेय मुळे, टांगा चालक बबनराव काळभोर इत्यादी नागरिक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या