Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAssembly Election 2024 : बारामतीमधून जय पवार विधानसभेच्या रिंगणात? अजित पवारांकडून संकेत

Assembly Election 2024 : बारामतीमधून जय पवार विधानसभेच्या रिंगणात? अजित पवारांकडून संकेत

मुंबई । Mumbai

बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Election) नणंद विरुद्ध भावजय अशी लढत संपूर्ण देशाने पाहिली. पण आता आगामी विधानसभा निवडणुकीत भाऊ विरुद्ध भाऊ अशी लढत बारामतीत होण्याची चिन्ह आहेत.

- Advertisement -

एकीकडे बारामतीमधून अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीचे जयंत पाटील यांनी संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीत जय पवारांना उतरवण्याच्या प्रश्नावर मोठं विधान केलं आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिल आहे.

हे हि वाचा : विधानसभेला कर्जत-जामखेडमधून अजितदादा रिंगणात उतरणार?

‘बारामती विधानसभा मी सात-आठ वेळा लढलोय मला इंटरेस्ट नाही, कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जय पवारला संधी देऊया’, असं म्हणत बारामती विधानसभेबाबत अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार उमेदवार असण्याची शक्यता आता स्पष्ट होताना दिसत आहे.

हे हि वाचा : अद्वय हिरेंना दिलासा; नऊ महिन्यांनी तुरुंगातून सुटका

लोकसभा निवडणुकीपासून अजित पवारांचे सख्ख्ये पुतणे युगेंद्र पवार हे बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी युगेंद्र यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. या निवडणुकीत बारामती तालुक्यातूनही सुप्रिया सुळे यांना ४८ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाल्याने विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या पक्षात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या