Wednesday, January 7, 2026
HomeनगरAhilyanagar : नगरमध्येही जैन समाजाची जागा व मंदिर विकण्याचा डाव

Ahilyanagar : नगरमध्येही जैन समाजाची जागा व मंदिर विकण्याचा डाव

माजी आ. रवींद्र धंगेकर यांचा पत्रकार परिषदेत आरोप

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर शहरातील जैन समाजाची ऐतिहासिक जागा व त्या ठिकाणी असलेले मंदिर विकण्याचा डाव आहे. हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. त्या जागेच्या विक्रीप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी माजी आ. रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी केली. अहिल्यानगर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

यावेळी खासदार नीलेश लंके, ठाकरे शिवसेना शहरप्रमुख किरण काळे, विक्रम राठोड, योगीराज गाडे, मनोज गुंदेचा, विकेश गुंदेचा, महावीर मुथा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यापूर्वी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांची भेट शिष्टमंडळाने घेतली. मंदिराच्या जागेतील अतिक्रमित बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा तक्रार अर्ज काळे यांनी दिला.
धंगेकर म्हणाले की, जैन मंदिराची ही जागा गेल्या 70-80 वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या नोंदीमध्ये मंदिर म्हणून नोंदवलेली आहे. मूळतः ही जागा जैन समाजाला देताना ती विकू नये, असे स्पष्टपणे कागदपत्रांत नमूद आहे.

YouTube video player

मात्र तरीही ट्रस्टींनी धर्मादाय आयुक्तांची कोणतीही परवानगी न घेता पेपरमध्ये जाहीर नोटीस प्रसिद्ध करून जागा विक्रीला काढल्याचा आरोप त्यांनी केला. खा लंके म्हणाले, धर्मस्थळाची जागा बळकावण्याचा प्रकार झाल्यास लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. महानगरपालिकेकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत, ही बाब चिंताजनक आहे. संबंधित ट्रस्टींना जागा विकण्याचा अधिकारच नाही. काळे म्हणाले, येत्या एक-दोन दिवसांत ट्रस्ट अध्यक्ष सुभाष मुथा आणि अन्य ट्रस्टींविरुद्ध पोलिसांत फिर्याद देणार आहे.

भगवान महावीर सेना स्थापन करावी
राज्यभरातील असे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व समाजासाठी काम करण्यासाठी जैन समाजाने पुढाकार घेऊन गटातील युवकांनी ‘भगवान महावीर सेना’ संघटना स्थापन करावी. जैन समाजाच्या धर्मस्थळांवर कुणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याविरोधात संघटित चळवळ उभारण्याचे आवाहन रवींद्र धंगेकर यांनी केले.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...