Saturday, May 18, 2024
Homeजळगावजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ता समीकरण बदलणार!

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ता समीकरण बदलणार!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्यात महाविकास आघाडी सत्तेतून (change of government) पायउतार झाल्यानंतर भाजप-शिंदे गटाची सत्ता आलेली आहे. या सत्तासमीरण बदलाच्या नांदीमुळे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती(Jalgaon Agricultural Produce Market Committee) निवडणुकीत (election) देखील बदल घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील 12 कृउबा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून (political parties) बैठकीतून मोर्चेबांधणी (Building a front)सुरु झालेली आहे. त्यातच जळगाव कृउबा निवडणुकीसाठी माजी सभापती लक्ष्मण पाटील ऊर्फ लकी टेलर यांच्याकडून स्वतंत्र पॅनल देण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, जळगाव कृउबा निवडणुकीसाठी तिरंगी की चौरंगी लढत रंगणार याविषयी उत्सुकता लागून आहे.

- Advertisement -

गेल्या 20 ते 25 वर्षात जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर सुरेशदादा जैन पुरस्कृत शिवसेनेची सत्ता होती. मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे प्रकाश नारखेडे वगळता जळगाव कृउबावर शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे. आता शिवसेनेत दोन गट पडल्याने शिवसेना शिंदे गट देखील मैदानात उतरणार असून त्यादृष्टीने तयारी देखील सुरु केली आहे. तर ठाकरे गटाचे आजी माजी संचालक महाविकास आघाडीसोबत राहून लढणार आहे.

सध्या भाजपदेखील स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लढण्याचा नारा दिलेला आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडूनही स्वबळावर निवडणुका लढण्याचा सूर उमटत आहे. मात्र, शिवसेना शिंदे गट व भाजप युती संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची बैठक झाल्यानंतर निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट या महाविकास आघाडीकडून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविण्यासाठी मैदानात उतरली आहे. तसेच मागील पंचवार्षिक निवडणुकीत माजी सभापती लक्ष्मण पाटील ऊर्फ लकी टेलर यांनी स्वतंत्र पॅनल देवून निवडणूक लढविली होती. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले होते. तसेच भाजपचे माजी सभापती प्रकाश नारखेडे यांच्यानंतर पाच संचालकांच्या बळावर लकी टेलर यांची कृउबा सभापतीपदी वर्णी लागली होती.

लकी टेलर यांनी आपला कार्यकाळ ठरल्यानुसार सभापती पदाचा राजीनामा देवून कैलास चौधरी यांना सभापती पदाची संधी दिली होती. चौधरी यांनी सभापती पदाचा आपला कार्यकाळ पूर्ण केला. मात्र, निवडणुका लांबणीवर पडल्याने त्यांना सहा महिने पुन्हा सभापती पदाची संधी मिळाली होती. आता लकी टेलर यांच्या गटापैकी कैलास चौधरी हे पालकमंत्री गुलाबराव पाटील समर्थक झालेले असून लकी टेलर स्वतंत्र पॅनल देणार की भाजप-शिवसेना शिंदे गट की महाविकास आघाडीशी जुळवून करणार याविषयी उत्सुकता लागून आहे.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सोमवारपासून सुरु होत आहे. या निवडणुकीसंदर्भात दोन दिवसात आपली भूमिका मांडणार आहे.

लक्ष्मण पाटील, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव

आजपासून अर्ज विक्री

जळगाव कृउबा समितींसाठी सोमवारपासून अर्ज विक्री-स्विकृती करण्यास प्रारंभ होत आहे. दि.27 मार्च ते 3 एप्रिलदरम्यान नामनिर्देशन पत्र विक्री आणि स्विकृती करण्यात येणार आहे. 5 एप्रिल रोजी अर्ज छाननी, दि.6 एप्रिल रोजी वैध नामनिर्देशन यादी प्रसिद्ध होईल.

18 जागांसाठी निवडणूक

सोसायटी-11, ग्रामपंचायत-4, व्यापारी- 2 आणि हमाल व मापाडी-1 अशा एकूण 18 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. जळगाव तालुक्यात 801 सोसायटी मतदार, 692 ग्रामपंचायत, 602 व्यापारी आणि 886 हमाल-मापाडी असे एकूण 2 हजार 981 मतदार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या