जळगाव । प्रतिनिधी
शाळा, महाविद्यालयातील स्नेहसंमेलनातूनच भावी कलाकार घडसात असे मत रंगकर्मी विनोद ढगे यांनी व्यक्त केले. बी.यू.एन.रायसोनी मराठी प्राथमिक, माध्यमिक विभागाच्या दि.23 रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्य संकुल महाबळ, जळगाव येथे पार पडलेल्या स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
या स्नेहसंमेलनाची सुरूवात गणेश वंदनाने झाली व विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य सादर केले. या कार्यक्रमास पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी एम.आय.डी.सी पो.स्टे.चे पी.आय.रणजीत शिरसाठ, शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रीत केले होते.
याप्रसंगी शाळेतील इयत्ता दहावीसह विविध स्पर्धा परिक्षांमध्ये उत्तम गुणांनी पास झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मान्यवरांच्याहस्ते बक्षीस देवून गौरविण्यात आले.
विशेष म्हणजे स्नेहसंमेलन प्रसंगी सादर होणार्या प्रत्येक गाणे, नृत्य या संदर्भात सुत्रसंचलनाचे कार्य विद्यार्थ्यांनीच उत्कृष्टपणे पार पाडल्याने त्यांचे सर्वांनी कौतुक केले. शिशुविहार विभागासह प्राथमिक, माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले.
अभ्यास, सराव, परीक्षा, व्यायाम, खेळ याप्रमाणेच दरवर्षी होणारे स्नेहसंमेलन देखील शालेय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे ही शाळा दरवर्षी स्नेहसंमेलन यशस्वीरित्या पार पाडत असते.
शाळेच्या वर्षभरातील यशस्वी वाटचालिवबद्दल मुख्याध्यापिका सौ.रेखा कोळंबे यांनी माहिती दिली. तर मान्यवरांचा परिचय सौ.सुरेखा बेंडाळे यांनी करून दिला. आभार सौ.सुप्रिया पाटील, मिनाक्षी चौधरी यांनी मानले.
शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, सौ.रेखा कोळंबे, इंग्रजी माध्यमच्या मुख्याध्यापिका सौ.नलीनी शर्मा, विठ्ठल पाटीलसर यांचेसह सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेवून स्नेहसंमेलन यशस्वी केले. कार्यक्रमाला पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.