महाराष्ट्र शासन लांडोरखोरी वनोद्यानात चिमुकल्यांनी केली मौजमजा
जळगाव –
शालेय जीवनातील आनंद देणारी बाब म्हणजे शैक्षणिक सहल. सहलीला जाण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी आसूसलेला असतो. सहल किती दिवसांची, कोठे जातेय यापेक्षा आपल्या सवंगड्यासह मोकळ्यात वातावरणात मौजमजा करायला मिळणार हा आनंद काही औरच असतो. बी.यू.एन.रायसोनी शिशुविहार व बालवाडी मराठी विभाग शाळेच्या विद्यार्थ्यांनी लांडोरखोरी उद्यान निसर्ग सहलीतून मिळणाऱ्या आनंदाला व्दिगुनीत करत धम्माल केली.
वर्गाच्या चार भिंतीच्या बाहेर असणाऱ्या निसर्गाचे दर्शन घडावे, विद्यार्थ्यांना अभ्यासातून सुटका मिळावी व मनोरंजनही व्हावे या हेतूने या सहलीचे आयोजन करण्यात आले.
बी.यू.एन.रायसोनी मराठी शिशुविहार, बालवाडी विभागाच्या विद्यार्थ्यांची शाळेतर्फे दि.२२ जानेवारी रोजी निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सहलीचा सुरक्षीत प्रवास व्हावा यासाठी मोठ्या लक्झरीबसची व्यवस्था करण्यात आली होती.
या सहलीतून विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञान, विज्ञानाबरोबर धम्माल मस्ती करून निसर्गाशी मैत्री वेगवेगळ्या वनस्पती आणि पक्षांची माहिती जाणून घेतली.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षणाऐवजी अनुभवात्मक शिक्षण देण्याच्या उद्देशाने या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खेळांचा आनंद घेत मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी भौगोलिक, सजीव सृष्टी, झाडे आदींची माहिती या सहलीमध्ये सहभागी शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना दिली. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापिका सौ.रेखा कोळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहलीत सहभागी शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.