Friday, May 3, 2024
Homeजळगावकरोनाचा कहर थांबता थांबेना; आणखी ८०१ पॉझिटिव्ह रुग्ण

करोनाचा कहर थांबता थांबेना; आणखी ८०१ पॉझिटिव्ह रुग्ण

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह ८०१ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता…

- Advertisement -

२८ हजार ९३३ झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील १९३, जळगाव ग्रामीणमधील ३८, भुसावळ येथील ६९, अमळनेरातील ५१, चोपडा येथील ८२, पाचोरा येथील ८, भडगावातील ६, धरणगावातील २१, यावलमधील २०, एरंडोल येथील १२८, जामनेरमधील ६२, रावेर येथील २०, पारोळ्यातील १७, चाळीसगाव येथील ५४, मुक्ताईनगरातील २, बोदवड येथील २२, परजिल्ह्यातील ८ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार ८३० रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील ५६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ७ हजार २७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण ८३१ रुग्ण दगावले. यातील ९ रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात २, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ३, अमळनेर येथे १, अरुश्री हॉस्पिटल १, एरंडोल येथे १, भुसावळ येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये एरंडोल शहरातील ८५ वर्षांचे दोन पुरुष, भुसावळ तालुक्यातील ६६ वर्षीय पुरुष व ७५ वर्षीय महिला, अमळनेर तालुक्यामधील ४९ वर्षीय महिला, जामनेर तालुक्यातील ६३ वर्षीय पुरुष, भडगाव तालुक्यामधील ७० वर्षीय पुरुष, रावेर तालुक्यातील ७९ वर्षीय पुरुष आणि चाळीसगाव तालुक्यामधील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

या अगोदर आढळले ५४१ रुग्ण
या अगोदर मंगळवारी जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह ५४१ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी ५३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर उपचारादरम्यान ९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या