Friday, May 3, 2024
Homeजळगावजिल्ह्यात बाधितांच्या संख्येत घट

जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत घट

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. यात आज दिवसभरात जिल्ह्यात 802 नवे बाधित रुग्ण आढळून आले असून 1 हजार 99 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच 19 जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात मृत्यूदराची चिंता व्यक्त केली आहे. .

- Advertisement -

जिल्ह्यात आज 3 मे रोजी दिवसभरात 802 नवे बाधित रुग्ण आढळून आल्याने ती संख्या 1 लाख 24 हजार 646 एवढी झाली आहे.

तर दुसरीकडे 1 हजार 99 रुग्ण करोनामुक्त झाले असून मुक्त होणार्‍यांची संख्या ही 1 लाख 12 हजार 356 इतकी झाली आहे.

नवे आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 171, जळगाव ग्रामीण 64, भुसावळ 69, अमळनेर 24, चोपडा 44, पाचोरा 28, भडगाव 10,धरणगाव 20, यावल 19, एरंडोल 73, जामनेर 57, रावेर 64,पारोळा 15, मुक्ताईनगर 23, चाळीसगाव 69, बोदवड 26 आणि इतर जिल्ह्यातील 26 असे एकूण 802 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

मृत्यूदर आटोक्यात येईना

गेल्या दोन महिन्यांपासून मृत्यू होणर्‍यांची संख्या वाढत आहे. मंगळवारी जिल्ह्यात 19 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जामनेर तालुक्यातील 4, भडगाव व पाचोरा तालुक्यातील प्रत्येकी तीन, चोपडा, रावेर, बोदवड तालुक्यातील प्रत्येकी दोन तर मुक्ताईनगर, अमळनेर व जळगाव शहरातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 235 इतकी झाली आहे.

208 अहवाल प्रलंबित

प्रशासनाकडून बाधित रुग्णाच्या संपर्कात येणार्‍यांची चाचणी केली जात आहे. तात्काळ चाचणी तात्काळ उपचार ही पद्धत अवलंबविली जात आहे. परंतु दुसरीकडे रुग्णांचे अहवाल चार ते पाच दिवस प्रलंबित असल्याने रुग्ण बिनधास्तपणे शहरात फिरत आहे. आज जिल्ह्यात सुमारे 208 रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या