Friday, May 3, 2024
Homeजळगावदिलासादायक : जिल्ह्यात केवळ 1 बाधिताचा मृत्यू

दिलासादायक : जिल्ह्यात केवळ 1 बाधिताचा मृत्यू

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील आटोक्यात आली आहे.

- Advertisement -

बुधवारी जिल्ह्यात 106 नवे बाधित रुग्ण आढळून आले असून 261 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. दिवसभरात केवळ एकच बाधिताचा मृत्यू झाला असल्याने ही जिल्हावासीयांसाठी दिलासा देणारी बाब आहे.

जिल्ह्यात नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 26, जळगाव ग्रामीण 5, भुसावळ 7, अमळनेर 0, चोपडा 8, पाचोरा 5, भडगाव 1, धरणगाव 0, यावल 4, एरंडोल 11, जामनेर 8, रावेर 5, पारोळा 5, चाळीसगाव 16, मुक्ताईनगर 3, बोदवड 2 व इतर जिल्ह्यातील 0 असे एकूण 106 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधिताची संख्या 1 लाख 41 हजार 209 एवढी झाली आहे. तर 1 लाख 36 हजार 190 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात 2 हजार 461 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

गेल्या काही महिन्यांपासून मृत्यू होणर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. मात्र आता मृत्यू होणार्‍यांची संख्या कमी होत असून बुधवारी जिल्ह्यात केवळ चाळीसगाव तालुक्यातील एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 558 इतकी झाली आहे. तसेच जिल्ह्यात सद्यास्थितीला 2 हजार 461 अ‍ॅक्टिव्हव रुग्ण असून दिवसेंदिवस त्यामध्ये संख्येत घट होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या