Friday, May 3, 2024
Homeजळगावजळगाव : जिल्ह्यात आढळले 743 करोनाबाधित रुग्ण

जळगाव : जिल्ह्यात आढळले 743 करोनाबाधित रुग्ण

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात दिवसेंदिवस करोना बाधीतांची संख्या वाढत असतांनाच बुधवारी पुन्हा नव्याने 743 रुग्ण आढळुन आले आहे.

- Advertisement -

यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 40 हजार 908 इतकी झाली आहे. तर बुधवारी दिवसभरात 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 200, जळगाव ग्रामीणमधील 25, भुसावळ येथील 43, अमळनेरातील 56, चोपडा येथील 65, पाचोरा येथील 04, भडगावातील 46, धरणगाव 23, यावल येथील 14, एरंडोल येथील 47, जामनेरातील 61, रावेर येथील 27, पारोळा येथील 34, चाळीसगावमधील 66, मुक्ताईनगरातील 16, बोदवड येथील 09 परजिल्ह्यातील 07 रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 29 हजार 891 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 723 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 9 हजार 990 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण 19 रुग्ण सोमवारी दगावले. यापैकी 04 मृत्यू शासकीय वैद्यकिय महविद्यालय, 06 मृत्यू डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय, 03 मृत्यू अमळनेर, 01 मृत्यू लोकसेवा हॉस्पीटल जळगाव,01 मृत्यू रुबी हॉस्पीटल , 01 मृत्यू ओम ्रकीटीकल, 01 मृत्यू रेल्वे हॉस्पीटल भुसावळ, 01 मृत्यू मुक्ताईनगर येथे. तर 01 मृत्यू गोल्ड सीटी हॉस्पीटल येथे झाले आहेत.

मृत्यू झालेल्यांमध्ये जळगाव शहरातील 50, 61,83, 89 वर्षीय पुरुष भुसावळ तालुक्यातील 40, 65, 70 वर्षीय पुरुष आणि 60 वर्षीय महिला, जळगाव तालुक्यातील 76 वर्षीय पुरुष, 63,70 वर्षीय महिला, अमळनेर तालुक्यातील 75,76,80 वर्षीय पुरुष, जामनेर तालुक्यातील 46,60,73 वर्षीय पुरुष, चोपडा तालुक्यातील 51 वर्षीय महिला, धरणगाव तालुक्यातील65 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या