जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
जिल्ह्यात दिवसेंदिवस करोना बाधीतांची संख्या वाढत आहे. गुरुवारी पुन्हा नव्याने ९४८ रुग्ण आढळुन आले आहे.
यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४१ हजार ८५६ इतकी झाली आहे. तर गुरुवारी दिवसभरात १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील २५२, जळगाव ग्रामीणमधील ५५, भुसावळ येथील ८८, अमळनेरातील ७९, चोपडा येथील ४७, पाचोरा येथील ४३, भडगावातील ११, धरणगाव ४६, यावल येथील ५८, एरंडोल येथील ३३, जामनेरातील ७३, रावेर येथील १५, पारोळा येथील १२, चाळीसगावमधील ९२, मुक्ताईनगरातील १६, बोदवड येथील १३ परजिल्ह्यातील १५ रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ३० हजार ७०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील ८११ रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या १० हजार १११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण १६ रुग्ण सोमवारी दगावले.
यापैकी ०४ मृत्यू शासकीय वैद्यकिय महविद्यालय, ०५ मृत्यू डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय, ०३ मृत्यू अमळनेर, ०३ मृत्यू निलकमल हॉस्पिटल, ०१ मृत्यू गोल्डसीटी हॉस्पिटल येथे झाला आहे.
मृत्यू झालेल्यांमध्ये जळगाव शहरातील ५८, ६१,७३ वर्षीय पुरुष आणि ४१ व ६० वर्षीय महिला, अमळनेर तालुक्यातील ५०,७६,८० वर्षीय पुरुष, ५८ वर्षीय महिला, भुसावळ तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष आणि ५५ वर्षीय महिला, धरणगाव तालुक्यातील ८१ वर्षीय पुरुष ७५ वर्षीय महिला, पाचोरा तालुक्यातील ७२ वर्षीय पुरुष, जामनेर तालुक्यातील ५० वर्षीय पुरुष, यावल तालुक्यातील ५८ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.