चोपडा | प्रतिनिधी | Chopda
जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) चोपडा शहरात (Chopda City) मुलीने प्रेमविवाह (Love Marriage) केल्याच्या रागातून सेवानिवृत्त सीआरपीएफ बापाने मुलीसह जावयावर गोळीबार (Firing) केला आहे. या गोळीबारात मुलीचा मृत्यू झाला असून, जावई गंभीर जखमी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, किरण मांगले (Kiran Mangale) असे गोळीबार केलेल्या बापाचे नाव असून, ते सीआरपीएफतून (CRPF) सेवानिवृत्त झालेले आहेत. मुलीने प्रेमविवाह केल्याचा रागातून मांगले यांनी पिस्तूलातून तीन राउंड फायर करत पोटच्या मुलीची हत्या (Murder) केली. तर गोळीबारात जावई गंभीर जखमी झाला आहे. साधारणता वर्षभरापूर्वी मांगले यांच्या मुलीने अविनाश वाघ याच्याशी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर हे दाम्पत्य पुण्यात (Pune) राहत होते.
यानंतर काल (शनिवारी) ते चोपडा येथे अविनाशच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी आले होते. याची माहिती मिळताच किरण मांगले यांनी चोपड्यात थेट हळदीच्या ठिकाणी पोहोचत आपल्या जवळील बंदुकीतून (Gan) मुलीवर गोळ्या झाडल्या. यात तिचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर जावई गंभीर जखमी झाला आहे. यावेळी तेथील जमावाने मांगले यांना चांगलाच चोप दिल्याने ते देखील गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, मांगले यांच्यासह जावयाला जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात (Jalgaon District Hospital) दाखल करण्यात आले असून, त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू केला आहे. या ऑनर किलिंगच्या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे.