Friday, May 3, 2024
Homeजळगावखाऊचे आमिष दाखवून दोन परप्रांतीय चिमुकल्यांचे अपहरण

खाऊचे आमिष दाखवून दोन परप्रांतीय चिमुकल्यांचे अपहरण

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरातील गोपाळ पूरा येथे रोजगाराच्या निमित्ताने राहत असलेल्या मध्यप्रदेशातील परप्रांतीय कुटुंबांतील दहा वर्षाची मुलगी व नऊ वर्षांचा मुलगा या दोन जणांचे खाऊचे आमिष दाखवून तरुणाने अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी आज शनिवारी रात्री सात वाजेच्या सुमारास पिडीत बालकाच्या आईच्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिसात मुलांचे अपहरण करणार्‍या संशयित सुनील पडत्या बारेला रा. चिरमलीया जि.बडवानी, मध्यप्रदेश याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत बालकांचे कुटुंबिय हे मूळ मध्यप्रदेशातील असून रोजगार निमित्ताने शहरातील गोपाळपूरा येथे वास्तव्यास आहेत. या कुटुंबाच्या ओळखीतील सुनील पडत्या बारेला हा तरुण 27 मे रोजी जळगावात आला.

यादरम्यान सुनील बारेला हा गोपाळपूरा येथे बालकांच्या घरी आला. दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्याने दहा वर्षाची मुलगी व 9 नऊ वर्षाचा मुलगा यास खाऊ घेवून देण्याचे आमिष दिले. खाऊ घेण्यासाठी दोघांना सोबत घेवून सुनील बारेला घराबाहेर पडला. यानंतर सुनील हा परतला. तसेच त्याच्यासोबत घेवून गेलेली दोन्ही बालकेही आढळून आली नाही.

सर्वत्र शोध घेतल्यानंतर दोन्ही मुले मिळून न आल्याने आज शनिवारी पिडीत मुलांपैकी एकाच्या आईने शनिवारी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात मुलांना पळवून नेणार्‍य सुनील पडत्या बारेला याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपर पोलिस अधीक्षकांनी कुटुंबियांकडून घेतली माहिती

दरम्यान या गंभीर प्रकाराची माहिती मिळाल्यावर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह शनिपेठचा प्रभारी पदभार असलेले पोलीस निरिक्षक धनंजय येरूळ यांनी गोपाळपूरा गाठत कुटुंबियांकडून माहिती जाणून घेतली.

संशयिताचे वर्णन, यासह चिमुकल्याचे वर्णन यासह इतरची माहिती अपर पोलीस अधीक्षकांनी पिडीत चिमुकल्यांच्या कुटुंबियांकडून घेतली. त्यानुसार संशयितांच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेसह शनिपेठ पोलिसांचे पथक रवाना करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या