Saturday, April 26, 2025
Homeजळगावनाशिक विभागात जळगाव जिल्हा अव्वल!

नाशिक विभागात जळगाव जिल्हा अव्वल!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेतलेल्या बारावीचा निकाल (12th Result) गुरुवारी दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर केला. यात जळगाव जिल्ह्याचा निकाल 93.26 टक्के लागला आहे. नाशिक विभागात (Nashik Division) जळगाव जिल्हा अव्वलस्थानी (Jalgaon district tops) आला असून 46 हजार 731 विद्यार्थ्यांपैकी 43 हजार 327 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

- Advertisement -

जळगावनंतर नंदुबार जिल्हा निकालात दुसर्‍या क्रमांकावर असून 16 हजार 525 विद्यार्थ्यापैकी 15 हजार 257 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विद्यार्थ्यांना बारावीची गुणपत्रिका व स्थलांतर प्रमाणपत्र त्यांच्या शाळा महाविद्यालयामार्फत 5 जूनपासून दुपारी तीन वाजेनंतर वितरित करण्यात येणार आहे.

नाशिक विभागात 89 हजार 105 मुले व 69 हजार 897 मुली असे एकूण 1 लाख 59 हजार 002 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती. त्यापैकी 1 लाख 45 हजार 749 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुले 89.46 तर 94.46 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. नाशिक विभागाचा 91.66 टक्के निकाल लागला असून यंदा देखील बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.

यंदा सुधारीत मुल्यमापन कार्यपध्दतीनुसार परिक्षांचे आयोजन करण्यात आले होते. यात नाशिक विभागाचा 90.13 टक्के निकाल लागला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्याचा 93.26 टक्के निकाल लागला आहे. बारावीच्या परीक्षेसाठी 46 हजार 731 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 43 हजार 327 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी 93.26 टक्के आहे.

बारावी परीक्षेला जळगाव जिल्ह्यातून विज्ञान शाखेतून 22 हजार 158 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 21 हजार 720 जण उत्तीर्ण झाले असून त्यात 13 हजार 386 मुलं व 8 हजार 334 मुलींचा समावेश आहे. त्यांची टक्केवारी 96.84 इतकी आहे. कला शाखेत जिल्ह्यातून परीक्षेला बसलेल्या 16 हजार 944 विद्यार्थ्यांपैकी 14 हजार 716 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी 84. 01 इतकी आहे. वाणिज्य शाखेतून परीक्षेला बसलेल्या 5 हजार 550 विद्यार्थ्यांपैकी 5 हजार 319 जण उत्तीर्ण झाले असून त्यांचा निकाल 94 टक्के लागला आहे. व्होकेशनलचा निकाल 85.96 टक्के तर टेक सायन्सचा निकाल 92.85 टक्के लागला आहे.

विभागाचा निकाल

नाशिक- 90.13

धुळे- 92.29

जळगाव-93.26

नंदुरबार- 93.26

शहरात देवेश, दीपिका, रसिका, देवेश ठरले टॉपर

जळगाव जिल्ह्यात बारावी परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले असून शहरात विज्ञान शाखेतून प्रथम सेंट टेरेसा विद्यालयाची विद्यार्थीनी दीपिका चव्हाण ही 91.17 टक्के मिळवून प्रथम आली आहे. वाणिज्य शाखेतून स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रथम देवेश तापडीया हा 97.67 टक्के तर कला शाखेतून रसिका ढेपे हि विद्यार्थीनी 95.50 टक्के मिळवून प्रथम आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...