Friday, May 3, 2024
Homeजळगावपीककर्जाची टोलवाटोलवी

पीककर्जाची टोलवाटोलवी

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

खरीप हंगाम संपुष्टात येण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक असला तरी या खरीप हंगामात हाती पैसा शिल्लक नसल्यामुळे बहुतांश…

- Advertisement -

शेतकर्‍यांना आर्थिक विवंचनेत सामोरे जावे लागत आहे. खरीप पीककर्ज वितरणाची आवश्यकता असतांना आवश्यक असलेले कागदपत्रे जोडून सुद्धा अनेकविध कारणांमुळे टोलवाटोलवी करुन शेतकर्‍यांना पीककर्जापासून वंचित ठेवले जात असल्याचा प्रकार समोर आले आहे.

खरीपासह आगामी रब्बी हंगामातील तसेच मध्यम मुदतीसाठीच्या केळी, डाळींब, लिंबू, पेरू, ऊस, हळद, आले वा अन्य पिकांसाठी कर्जाची नितांत आवश्यकता आहे. मात्र, पीककर्ज वितरणात टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहेत.

जिल्ह्यात सद्य:स्थितीत खरीप हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असून काही दिवसांत काढणीस येतील असे चित्र आहे. सद्यस्थितीत वातावरण स्वच्छ नसले तरी पाऊस अत्यंत कमी प्रमाणात आहे. मात्र, गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे काही ठिकाणी शेतातच उडीद, मूगांच्या शेंगांना मोड आले आहेत. त्यामुळे उडीद, मूग, तीळ आदींसारखे खरीप हंगामातील नगदी पिके हातची वाया गेली आहेत. त्यामुळे आगामी काळात दसरा, दिवाळी सणाची शेतकर्‍यांना चिंता भेडसावत आहे.

करपात्र नसले तरी पॅनकार्ड जोडणे आवश्यक

गेल्या दिवाळीनंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी शासनाने जाहीर केल्यानुसार फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यात शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या याद्या जाहीर केल्या होत्या. त्यातील शेतकर्‍यांपैकी 25 टक्के शेतकर्‍यांना अजूनही कर्जमुक्तीचा लाभ नाही. यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता पीककर्जधारक शेतकर्‍यांनी पॅनकार्डची जोडणी कर्जखात्यास केली असल्याने कर्जमुक्तीत अडथळे येत असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे याच सर्व बँक प्रशासनाच्या नियमानुसार केवायसीसाठी आधार व पॅनकार्डची जोडणी करणे आवश्यक आहे. त्याशिवाय कोणत्याही योजनेचा लाभ शेतकर्‍यांना मिळू शकणार नाही असेही बँक प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

250 च्यावर शाखांमध्येे खाती

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 250 च्यावर शाखांमध्येे शेतकर्‍यांच्या खात्याचे सर्वाधिक प्रमाणात आहेत. त्याखालोखाल राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये देखिल काही खाती असताना शेतकर्‍यांना पीककर्जापासून वंचित राहावे लागत आहे. शेतकर्‍यांच्या हाती आगामी हंगामासाठी भांडवल नसल्याने आणि कर्जमुक्तीत अनेक अडथळे निर्माण होत आहेत. अडचणीत असलेल्या शेतकर्‍याला कर्ज का दिले जात नाही, असे प्रश्न आढावा बैठकीत नेहमीच निरूत्तरीतच रहातात. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन शेतकर्‍यांना पीककर्जासाठी मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना आहे. त्यासाठी शेतकर्‍यांनी पॅन कार्ड जोडणे आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या