Saturday, March 29, 2025
Homeजळगावअधिवेशन शांततेत होणार !

अधिवेशन शांततेत होणार !

जळगाव – 

आगामी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा, काही विधेयके मंजूर करणे आणि आयत्यावेळी येणार्‍या विषयांवर चर्चा असल्याने हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार नसल्याचे सुतोवाच माजी मंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले.

- Advertisement -

आ.गुलाबराव पाटील व मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांनी दैनिक ‘देशदूत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. एकेकाळचा आमचा मित्रपक्ष असलेला आणि सर्वात जास्त सदस्य संख्या असलेला भाजप या अधिवेशनात विरोधी बाकावर बसणार असून अल्पसंख्य असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेनेचे सदस्य सत्ताधारी बाकावर असतील हे या अधिवेशनाचे वैशिष्ट असेल. अधिवेशनापूर्वी 40 दिवस अगोदर प्रश्न दिले गेले नसल्याने व तसा कालावधी लाभला नसल्याने या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास नसेल आणि लक्ष्यवेधी सूचना व स्थगनप्रस्तावही मांडले जाणार नाहीत असे वाटते.

कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी केलेले परीवर्तन यामुळे आपणास आमदार पदाची संधी लाभली असून मतदारसंघाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशिल राहणार असल्याचे आ.चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी पाळधीचे माजी सरपंच आलीम देशमुख यांच्यासह प्रविण पाटील, के.टू.पाटील उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २९ मार्च २०२५ – वल्लीमध्ये जीवन। नाना फळीफुली जीवन।

0
वसुंधरेच्या जीवसृष्टीतील झाडांचे महत्त्व सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मानवी मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. झाडे तोडणे मानवी हत्येपेक्षाही गंभीर आहे अशी टिप्पणी केली आहे....