Wednesday, March 26, 2025
Homeजळगावजळगाव : प्रा.के.वाय.देशमुख यांची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव : प्रा.के.वाय.देशमुख यांची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव । प्रतिनिधी

नूतन मराठा महाविद्यालयातील बायो विभागाचे प्रमुख प्रा.के.वाय.देशमुख (किशोर यादवराव देशमुख, वय 58, चांदनी चौक, शिव कॉलनी) यांनी गळफास घेवून राहत्या घरी वरच्या मजल्यावर गुरुवारी सकाळी 10 ते 11 वाजेदरम्यान आत्महत्या केली.

- Advertisement -

शारीरिक व्याधीच्या त्रासामुळे मनस्थिती खचल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीतून लक्षात येते.

या घटनेप्रसंगी घराच्या तळमजल्यावर सर्व जण होते. मुंबईला शिकत असलेला मुलगा आणि अमेरिकेत नोकरी करणारी विवाहित मुलगी देखील घरी आलेली होती.

सकाळी वरच्या मजल्यावर देवपूजा केल्यानंतर त्यांनी स्वत:चा जीवनप्रवास संपवला. बराच वेळ झाला तरी ते जेवणाला तळमजल्यावर आले नाही. कारण नेहमीप्रमाणे देवपूजेनंतर ते जेवण करुन महाविद्यालयात 10.30 वाजता जात असत. त्यामुळे त्यांना बोलवण्यासाठी त्यांची पत्नी कुमुदिनी वरच्या मजल्यावर गेल्या असता प्रा.देशमुख यांनी साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, त्यांचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले.

याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय कुरकुरे यांनी खबर दिली. त्यावरुन रामानंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. प्रा.देशमुख यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ते नायगाव (ता.यावल) येथील मूळ रहिवासी आहेत. ते जुलै महिन्यात सेवानिवृत्त होणार होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...