Friday, May 3, 2024
Homeजळगावमनपाने ऑक्सिजन बेडयुक्त स्वतंत्र कोविड सेंटर सुरु करावे

मनपाने ऑक्सिजन बेडयुक्त स्वतंत्र कोविड सेंटर सुरु करावे

जळगाव – Jalgaon :

करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. सद्यास्थितीत शासकीय महाविद्यालय, गोदावरी वैद्यकिय महाविद्यालय, इकरा कॉलेज या तीन ठिकाणी रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड आहेत.

- Advertisement -

काही ठिकाणी ऑक्सिजन बेड शिल्लक नाहीत. परिणामी ऑक्सिजन अभावी मृत्यूदर वाढत आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे स्वतंत्र ऑक्सिजन बेड असलेले १०० बेडचे मोफत कोविड केअर सेंटर सुरु करावे.

अशी मागणी मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी केली आहे. तसेच रामेश्‍वर कॉलनी व सुप्रिम कॉलनीत महापालिकेचे रुग्णालय सुरु करावे असेही त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या