Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRajiv Deshmukh : चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Rajiv Deshmukh : चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

चाळीसगाव | प्रतिनिधी | Chalisgaon

चाळीसगावचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे नेते राजीव देशमुख (Rajiv Deshmukh) यांचे आज पहाटे हृदयविकाराने निधन (Heart Attack) झाले आहे. त्यांच्या निधनामुळे चाळीसगावसह जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

राजीव देशमुख यांनी २००९ ते २०१४ या कालावधीत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार (MLA) म्हणून प्रतिनिधित्व केले होते. आमदारकीच्या काळात त्यांनी चाळीसगाव आणि परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले. त्याआधी चाळीसगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते. त्यांचा २०१४ आणि २०१९ विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा प्रभाव कायम होता.

YouTube video player

दरम्यान, राजीव देशमुख सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे सामाजिक,राजकीय,औद्योगिक, शैक्षणिक बदलांचे शिल्पकार अजात शत्रू अस व्यक्तिमत्व सोडून गेल्याची भावना चाळीसगावकरांकडून व्यक्त होत आहे. तर देशमुख यांच्या निधनामुळे चाळीसगाव तालुक्यातील (Chalisgaon Taluka) सोशल मीडियावर काळी दिवाळी म्हणून शोक व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...