Sunday, March 30, 2025
Homeजळगावसाखरपुडा झाला कडू – पाचोरा येथे भावी नवरदेवाचा मृत्यू

साखरपुडा झाला कडू – पाचोरा येथे भावी नवरदेवाचा मृत्यू

पाचोरा – 

येथील वाणी समाजाच्या एका 27 वर्षीय तरुणाचा साखरपुड्याच्या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने वाणी समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला.

- Advertisement -

याबाबत  सविस्तर वृत्त असे की, शहरातील भडगाव रोडवरील  कृष्णाजीनगरमध्ये राहणारे प्रगतिशील शेतकरी सुरेश लक्ष्मण येवले (वाणी) यांचा एकुलता एक  मुलगा सौरभ सुरेश येवले (वय 27) याचा पाचोरा येथे दि.12 जानेवारी रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम होता.

यानिमित्ताने दोन्ही कुटुंबातील नातेवाईक व आप्तेष्ट जमले होते. साखरपुड्याची लगबग सुरू असताना सकाळी 11 वाजेच्या सुमारास सौरभ हा बाथरूममध्ये अंघोळीला गेला होता; परंतु बराच वेळ झाल्यानंतरही तो बाहेर येत नसल्याने कुटुंबातील महिला व पुरुषांनी बाथरूमचा दरवाजा ठोठावत त्याला आवाज दिला.

मात्र, आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी बाथरूमच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता, सौरभ निपचित पडलेला दिसला. बाथरूमचा दरवाजा तोडून त्याला बाहेर काढून खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टारांनी तपासून त्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे घोषित केले.  शवविच्छेदनासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयात त्याचा मृतदेह नेण्यात आले. तसेच पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत सौरभ हा नाशिक येथील ए.सी.डी. सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर म्हणून नोकरीला होता. त्याचा विवाह नाशिक येथीलच सोमनाथ शंकर कोठावदे यांची कंपनीत नोकरीला असलेली कन्या नेहा कोठावदे हिच्याशी दि.31 जानेवारी रोजी नाशिक येथे निश्चित झाला होता.

मात्र, लग्नबंधनात अडकण्यापूर्वीच साखरपुड्याच्या गोड कार्यक्रमाप्रसंगी सौरभचा हृदयविकाराने अकाली मृत्यू झाला. आनंदाच्या क्षणात दुःखाचे विरजण पडून दोन्ही कुटुंबांचा व भावी जीवनाच्या स्वप्नपूर्तीचा कार्यक्रम कडू झाला. सदर घटनेमुळे पाचोरा येथील येवले व नाशिक येथील कोठावदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याने वाणी समाजात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

सौरभच्या पश्चात आई-वडील, बहीण, काका-चुलते असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर रात्री शोकाकुल वातावरणात सौरभवर येथील वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

PM Modi : राष्ट्रीय स्वंयसेवक संघ हा महान अक्षय वटवृक्ष; पंतप्रधान...

0
नागपूर । Nagpur पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी नागपूर दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेत. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या...