Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! जालन्यात मराठा आंदोलकांचा गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला; दगडफेकीचा ही प्रयत्न

मोठी बातमी! जालन्यात मराठा आंदोलकांचा गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला; दगडफेकीचा ही प्रयत्न

जालना | Jalna
मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे आणि मनोज जरांगे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणारे अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात मराठा आंदोलकांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना वेळीच ताब्यात घेतले. सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कारवर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून वातावरण काही वेळ तणावपूर्ण झाले होते.

गुणरत्न सदावर्ते हे रविवारी जालना येथील धनगर उपोषण आंदोलनाला भेट जाण्यासाठी जात होते. त्यांच्या गाड्यांचा ताफा रस्त्यावरुन जात असताना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यावेळी मराठा आंदोलक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. याठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. आंदोलकांना पाहून पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. यानंतर आंदोलक गाडीवर धावून जातील, असे पोलिसांना वाटले नव्हते. मात्र, एके ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांना चुकवून गुणरत्न सदावर्ते यांची गाडी गाठण्यात यश मिळवले. या आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर धावून जात काचेवर फटके मारले. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येतात त्यांनी मराठा आंदोलकांना तातडीने पकडले. मात्र, तोपर्यंत दोन-तीन मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या लिमोझिन गाडीच्या काचेवर फटके मारले होते. यानंतर पोलिसांनी सर्व मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

दरम्यान, या प्रकरणी आता त्यांची चौकशी सुरू आहे. तर, दुसरीकडे सदावर्ते म्हणाले, मी आज डंके की चोट पर बोलणार आहे, धनगर बांधव एसटीमधून आरक्षण मिळावे यासाठी लढत आहेत. त्यांचे मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो, मी जालन्याकडे येत असताना काही लोकांनी गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. असा हल्ला करुन मला कोणीही थांबवू शकत नाही. आपण संविधानाला जोडलेलो आहोत. मी तुमच्या भेटीला आलो, तुमचे माझे रक्ताचे नाते आहे, म्हणून आलो. स्टंटबाजी करण्यासाठी आलो नाही, नाटक करण्यासाठी आलो नाही. मी संविधानाचे बोलतो म्हणून सरकार माझे ऐकते, इंग्रजांच्या काळात जे समूह आदिवासी होते ते दुसरे तिसरे कोणी नसून धनगर आहेत, असा दावाही यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

YouTube video player

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या