Tuesday, January 6, 2026
Homeनगरजामखेडमध्ये कमळ फुललं! नगराध्यक्षांसह १५ उमेदवार विजयी, रोहित पवारांना धक्का

जामखेडमध्ये कमळ फुललं! नगराध्यक्षांसह १५ उमेदवार विजयी, रोहित पवारांना धक्का

जामखेड । प्रतिनिधी

कर्जत-जामखेडच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व गाजवत ऐतिहासिक यश मिळवले आहे. नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत भाजपच्या उमेदवार प्रांजल चिंतामणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) उमेदवार संध्या राळेभात यांचा पराभव करत विजयाचा गुलाल उधळला आहे. विधानपरिषदचे सभापती राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्यातील थेट संघर्षात जामखेडच्या मतदारांनी शिंदेंच्या नेतृत्वावर मोहोर उमटवली आहे. नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही भाजपची लाट पाहायला मिळाली असून, एकूण जागांपैकी तब्बल 15 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे नगरपरिषदेत भाजपचे स्पष्ट बहुमत सिद्ध झाले आहे.

- Advertisement -

दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले, वंचित बहुजन आघाडीला 2, एकनाथ शिंदे शिवसेनेला 1 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली आहे.निवडणूक प्रचारात दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या होत्या, मात्र अंतिमतः जामखेडकरांनी भाजपला पसंती दिली. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी राम शिंदे आगे बढ़ोच्या घोषणा देत शहरात मोठा जल्लोष साजरा केला असून, या विजयाचे मुख्य शिल्पकार आमदार राम शिंदे असल्याचे मानले जात आहे.

YouTube video player

नगराध्यक्षपदाचे उमेदवार, पक्ष व मिळालेली मते – प्रांजल अमित चिंतामणी (भाजप)- 9754 (विजयी)
जैनब वाहेद कुरेशी (काँग्रेस) – 3095, सुवर्णा महेश निमोणकर (राष्ट्रवादी अजित पवार )- 2407, नसीम सलीम बागवान (अपक्ष)- 108, पायल आकाश बाफना (शिवसेना) -2041, प्रीती विकास राळेभात (अपक्ष )-1380, संध्या शहाजी राळेभात (राष्ट्रवादी शरद पवार )-6072, परवीन सिराजुद्दीन शेख (समाजवादी पार्टी) -68, रेश्मा युनूस शेख (अपक्ष ) -54.

नगरसेवक पदाचे प्रभाग निहाय उमेदवार, पक्ष व मिळालेली मते – प्रभाग क्रमांक 1 अ सुमन अशोक शेळके (भाजप) – 600 (विजयी), आशा दीपक कदम (अपक्ष ) – 389, संगीत नाना डोके (अपक्ष ) – 543, आरती महेंद्र राळेभात (राष्ट्रवादी शरद पवार)- 539, रेखा मोहन देवकाते (शिंदे गट) – 199, सारिका संजय डोके (राष्ट्रवादी अजित पवार ) – 262, नोटा – 0.

प्रभाग क्रमांक 1 ब श्रीराम अजिनाथ डोके (भाजप) – 1574 (विजयी ), संजय कोंडीबा डोके (राष्ट्रवादी शरद पवार )- 970, नोटा – – 49, प्रभाग क्रमांक 2 अ प्रवीण विठ्ठल सानप (भाजप) – 1299 (विजयी ), विजय विश्वभर राळेभात (अपक्ष) – 33, दिनेश रमेश राळेभात (शिंदे गट ) – 274, संदीप निवृत्ती गायकवाड (राष्ट्रवादी शरद पवार )- 794, नोटा – 13, प्रभाग क्रमांक 2 ब प्रीती प्रशांत राळेभात (राष्ट्रवादी शरद पवार )- 1203 (विजयी), कमल महादेव राळेभात (भाजप) – 1123, रेखा किरण मराळ (शिंदे गट )-101, नोटा- 17, प्रभाग क्रमांक 3 अ पोपट दाजीराम राळेभात (भाजप )- 718 (विजयी), शिवाजी ज्ञानदेव विटकर (शिंदे गट)- 78, ऋषिकेश विष्णू खरात (अपक्ष)- 443, आकाश विठ्ठल पिपळे (राष्ट्रवादी शरद पवार)- 278, सुरज अशोक निमोणकर (राष्ट्रवादी अजित पवार)- 67, विकास कचरू साळूंखे (अपक्ष)-12, नोटा – 5. प्रभाग क्रमांक 3 ब सीमा रविंद्र कुलकर्णी (भाजप) – 790 (विजयी), सोनाली पांडुरंग भोसले (अपक्ष ) -650, पार्वती विठ्ठल माकुडे (राष्ट्रवादी शरद पवार )- 148, नोटा – 13, प्रभाग क्रमांक 4 अ विकी धर्मेद्र घायतड्क (भाजप ) -699 (विजयी), विकी मुरलीधर सदाफुले (अपक्ष)- 454, सागर ज्ञानदेव सदाफुले (राष्ट्रवादी शरद पवार )-392, नोटा – 22. प्रभाग क्रमांक 4 ब प्रांजल अमित चिंतामणी (भाजप) – 1153 (विजयी), नामश फहीमुद्दीन शेख (शिंदे गट)-70, अमृता अमोल लोहकरे (राष्ट्रवादी शरद पवार)- 352, नोटा – 9, प्रभाग क्रमांक 5 अ हर्षद भाऊसाहेब काळे (भाजप) – 1114 (विजयी), पूजा उध्द्वव गडकर (राष्ट्रवादी शरद पवार)- 390, विकी संतोष पिपळे (शिंदे गट) – 184, द्वारका चंद्रकांत पवार (राष्ट्रवादी अजित पवार )- 85, पवन सीताराम पवार (अपक्ष) -9, भारत वसंत पवार (अपक्ष)- 11, नोटा – 11. प्रभाग क्रमांक 5 ब वर्षा कैलास माने (शिंदे गट)- 669 (विजयी), लता संदीप गायकवाड (भाजप)- 577, शीतल योगेश शेलार (काँग्रेस) – 37, जयश्री बजरंग डूचे (राष्ट्रवादी शरद पवार) -394, पूजा राजू शिंदे (राष्ट्रवादी अजित पवार)- 110, नोटा – 17. प्रभाग क्रमांक 6 अ संगीत रामचंद्र भालेराव (वंचीत) – 494 (विजयी), कोमल सनी सदाफुले (भाजप ) – 472, रुपाली अतिश पारवे (अपक्ष ) -59, प्रीती राहुल आहेर (राष्ट्रवादी शरद पवार ) – 476, पूजा अशोक सदाफुले (शिंदे गट) -98, नतुषा किशोर सदाफुले (अपक्ष) -41, रुपाली बाळू कांबळे (अपक्ष) – 244, नोटा – 11, प्रभाग क्रमांक 6 ब अरुण हौसराव जाधव (वंचित ) 764 (विजयी ), गुलचंद हिरामण अंधारे (भाजप) -560, सोहेल जावेद शेख (शिंदे गट) -81, संजय भानुदास भोसले (राष्ट्रवादी शरद पवार) -473, नोटा – 17. प्रभाग क्रमांक 7 अ नंदा प्रवीण होळकर (भाजप ) 910 (विजयी), नजमा नदीम सय्यद (काँग्रेस)- 360, अनुराधा संदीप अडले (राष्ट्रवादी शरद पवार) – 422, नोटा 16. प्रभाग क्रमांक 7 ब मोहन सीताराम पवार (भाजप) – 566 (विजयी), महेश बाबासाहेब देशमाने (अपक्ष) -390, बजरंग मनोहर सरडे (आप) – 32, मिठूलाल पोपटलाल नवलाखा (राष्ट्रवादी अजित पवार) -109, प्रदीप सोपान राळेभात (ठाकरे गट) – 534, दत्तात्रय भीमराव ढवळे (शिंदे गट ) -72, नोटा 5, प्रभाग क्रमांक 8 अ हिना इस्माईल सय्यद (राष्ट्रवादी शरद पवार ) 955 (विजयी), शोभा दिलीप वारे (भाजप) -323, शीतल प्रदीप बोलभट (शिंदे गट) – 395, रेश्मा युनूस शेख (अपक्ष) – 106, नोटा 23, प्रभाग क्रमांक 8 ब राजेंद्र अजिनाथ गोरे (राष्ट्रवादी शरद पवार) 723 (विजयी), राहुल अंकुश उगले (काँग्रेस) -420, शामीर लतीफ सय्यद (शिंदे गट) -348, युनूस दगडू शेख (भाजप) -48, चांद बापुलाल तांबोळी (अपक्ष) -104, गणेश भिकू काळे (राष्ट्रवादी अजित पवार) -149, नोटा -10 प्रभाग क्रमांक 9 अ वैशाली अर्जुन म्हेत्रे ( भाजप ) – 1113 (विजयी, शबाना नासिर सय्यद (राष्ट्रवादी शरद पवार) -1072, मुक्ता दिंगबर म्हेत्रे (राष्ट्रवादी अजित पवार) -187, नोटा 32, प्रभाग क्रमांक 9 ब तात्याराम रोहिदास पोकळे (भाजप) 1256 (विजयी), इरफान सल्लाउद्दीन शेख (राष्ट्रवादी अजित पवार) -203, तारेख फर्मान शेख (शिंदे गट ) -59, बिभीषण शामराव धनवडे (राष्ट्रवादी शरद पवार) -860, नोटा 26. प्रभाग क्रमांक 10 अ मेहरुन्निसा शफी कुरेशी (राष्ट्रवादी शरद पवार) 1016 (विजयी ), मीना हनुमंत धनवटे (भाजप) -302, ताहेरा सदरुहदहीन शेख (राष्ट्रवादी अजित पवार) -156, शेहनाज उमर कुरेशी (अपक्ष)- 885, नोटा 14. प्रभाग क्रमांक 10 ब वसीम इसाक सय्यद (राष्ट्रवादी शरद पवार) 1455 (विजयी), जयओम जालिंदर टेकाळे (शिंदे गट )- 138, अर्शद आयुब शेख (अपक्ष ) -548, आरिफ जमशिद सय्यद (भाजप) – 227, नोटा 16, प्रभाग क्रमांक 11 अ संजय नारायण काशीद (भाजप) 1435 (विजयी), बजरंग हनुमंत टाकले (अपक्ष) – 100, अनिल मधुकर श्रीरामे (रासप) -9, ऋषिकेश किसन बांबरसे (शिंदे गट) -431, हरिभाऊ नारायण आजबे (राष्ट्रवादी शरद पवार) -425, नोटा 8. प्रभाग क्रमांक 11 ब आशाबाई बापू टकले (भाजप) 1100 (विजयी), शाकुबाई गणेश आजबे (शिंदे गट) -660, सुलताना शाकीर शेख (अपक्ष) -18, अपूर्वा अमोल गिरमे (राष्ट्रवादी शरद पवार) -578, स्वाती अमित टकले (अपक्ष) -38, नोटा 14, प्रभाग क्रमांक 12 अ जया संतोष गव्हाळे (भाजप) 1510 (विजयी), अश्विनी निखिल घायतड्क (राष्ट्रवादी शरद पवार ) -968, नोटा 35. प्रभाग क्रमांक 12 ब महेश भारत निमोणकर (राष्ट्रवादी अजित पवार ) -905 (विजयी), मोहन तुकाराम गडदे (भाजप) -754, गोकुळ मारुती हुलगुंडे (राष्ट्रवादी शरद पवार) -824 नोटा 30.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावनिहाय स्वयंचलित हवामान केंद्रातून आता पावसाचे अपडेट

0
अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे लहरी, खराब हवामानामुळे शेतकर्‍यांना अनेकदा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम प्रोजेक्ट प्रकल्प...