Tuesday, February 3, 2026
HomeनगरJamkhed : कलाकेंद्रावर 17 जणांच्या जमावाचा हल्ला

Jamkhed : कलाकेंद्रावर 17 जणांच्या जमावाचा हल्ला

मोहा येथे तीन दिवसांत दुसरी घटना, गुन्हा दाखल

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड तालुक्यातील मोहा येथे असलेल्या रेणुका कलाकेंद्रात दि. 10 रोजी रात्रीच्या बाराच्या सुमारास अज्ञात 17 जणांच्या जमावाने तोंडाला रूमाल लावून तलवार, काठ्या, कोयते घेऊन आले. त्यांनी कलाकेंद्राच्या आवारातील दुचाकी व रिक्षा यांची तोडफोड केली तसेच गेटवर असलेल्या किराणा दुकानाचे काऊंटर फोडून कलाकेंद्रात प्रवेश करून तेथील होम थिएटर व लोकांना बसण्यासाठी ठेवलेल्या 50 खुर्च्याची तोडफोड केली. सुमारे वीस मिनिटे असा प्रकार चालू होता. सदर घटनेची माहिती पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली तोपर्यंत सर्व अज्ञात जमाव चारचाकी वाहनातून बीडच्या दिशेने निघून गेले. तीन दिवसांपूर्वी सदर रेणुका कलाकेंद्रावर आष्टी (जि. बीड) येथील तीन व जामखेड येथील एक जणांनी धुडगूस घातला होता.

- Advertisement -

याबाबत जामखेड पोलीसात ज्योती पवार (वय 40 वर्षे धंदा कलाकेंद्र, रा. रेणुका सांस्कृतीक लोकनाटक कला केंद्र, मोहा) यांनी फिर्याद दिली की, दि. 7 रोजी रेणुका कलाकेंद्रात शुभम लोखंडे, सतीश टकले, नागेश रेडेकर सर्व (रा. आष्टी जि. बीड) व अक्षय मोरे (चिंग्या) या आरोपींनी हातातील कोयत्याने रेणुका कलाकेंद्रातील खुर्च्या, टेबल व दोन चाकी मोटार सायकल स्कुटीची तोडफोड केलेबाबत व कलाकेंद्रातील नृत्यकाम करणारे मुलींची छेडछाड केलेबाबत याबाबत पहीला गुन्हा दाखल आहे.

YouTube video player

दिनांक 10 रोजी रात्री 12:10 वा. चे सुमारास रेणुका कलाकेंद्राच्या समोर तीन चारचाकी वाहने एका पाठोपाठ आल्या व त्यातील अनोळखी 17 इसम तोंडाला बांधून गाडीमधून खाली उतरून हातात काठ्या, तलवार, कोयते घेवून कलाकेंद्राचे आवारात लावलेले रिक्षा व तीन मोटार सायकल वाहनाची तोडफोड करून कलाकेंद्राचे गेटवर असलेले किराणा दुकानाचे काऊंटर फोडून कलाकेंद्रामध्ये आत शिरले व कलाकेंद्रामधील नृत्यकाम प्रॅक्टीस करणेसाठी ठेवलेले दोन होमथेटर व नृत्यकाम पाहण्यासाठी आलेल्या लोकांना बसण्यासाठी ठेवलेल्या 50 खुर्चाची तोडफोड करून ‘चिंग्याच्या नादी लागू नका, त्याचा परिणाम भोगावा लागेल’ असे म्हणून शिविगाळ केली व परिसरात दहशत निर्माण केली. त्यांच्या भितीनी आम्ही कला केंद्राच्या एका रूममध्ये लपून बसलो व पोलीसांना फोन केला असता ते चारचाकी वाहनातून सौताडाच्या दिशेने पळून गेले. पुढील तपास पोलीस नाईक रवींद्र वाघ करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेत पक्षातंर्गत सव्वा-सव्वा वर्षाचा फॉम्युला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या (सोमवार) दिवशी, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीने सत्तेचा स्पष्ट फॉर्म्युला...