Sunday, May 25, 2025
Homeनगरजामखेडकरांकडून 23 लाखांचा दंड वसूल

जामखेडकरांकडून 23 लाखांचा दंड वसूल

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

- Advertisement -

जामखेड पोलीसांनी शहरातील वाहतूक नियंत्रण करताना नियम भंग करणार्‍या वाहनचालकांवर विविध प्रकारच्या कारवाया करत तब्बल जानेवारी 2022 ते ऑक्टोबर 2022 या सात महिन्यांत 22 लाख 72 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल आजीनाथ जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली. यामध्ये वाहतुकीस अडथळा करणारी वाहने न्यायालय केसेस 28 – दंड 5600, अवैध प्रवाशी वाहतूक 5 केसेस – 13 हजार 300 रुपये दंड, दारू पिऊन वाहन चालवणे 9 केसेस – 16 हजार 900 दंड, ऑनलाईन 3 हजार 923 केसेस 22 लाख 72 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहन धारकांना शिस्त लावण्याबरोबरच दंडाची मोठी रक्कम वसूल करून शासनाला मोठा महसूल मिळवून देण्याचे कामही जामखेड पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेकडून केले आहे. या कामगिरीचे कौतुक होत आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉ. दिनेश गंगे, होमगार्ड रफिक तांबोळी यांनी ही कामगिरी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : चौंडी विकास आराखड्याचा शासन निर्णय लवकरच

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी (ता. जामखेड) राष्ट्रीय स्मारक होण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू असून त्याचाच भाग म्हणून नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडीत...