Saturday, January 24, 2026
Homeक्राईमजामखेड तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

जामखेड तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

पोलिसांच्या कृपाशिर्वादाचे नागरिकांकडून आरोप

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड शहर व तालुक्यात मटका, जुगार, दारू, गुटखा, सोरट असे अवैध धंदे खुलेआम सुरू असून हे सर्व जामखेड पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहे, असे आरोप नागरिकांकडून केले जात आहेत. आठ दिवसांपूर्वी जामखेड शहरालगत असलेल्या कला केंद्रावर साहित्य देण्यासाठी गेलेल्या एका व्यावसायिकास काहीही कारण नसताना गुंडांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांच्या चीरीमिरीमुळे व गुंडांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे या भागात गुंडगिरी वाढली आहे. जामखेड शहर व तालुक्यात मटका, जुगार, दारू शहरातील बाजारतळ, बसस्थानक परिसर, जामखेड नगर, बीड रस्त्यावर टपर्‍यांमध्ये खुलेआम मटका चालू असून फलक लावलेले आहेत.

- Advertisement -

कल्याण व मुंबई मटका सकाळपासून ते रात्री बारा एक वाजेपर्यंत चालू असतो. अनेकजण मटक्याचे रेकॉर्ड चाळत असतात. कल्याण मटका सकाळ नऊ ते एक या वेळेत ओपन तर चारच्या दरम्यान क्लोज येतो. तर मुंबई मटका दुपारी दोन ते रात्री नऊ वाजेपर्यंत ओपन व रात्री बारा एकच्या सुमारास क्लोज येतो. यामुळे मटका खेळणार्‍यांचे ओपन जेऊ देईना व क्लोज झोपू देईना अशी अवस्था झाली आहे. जामखेड शहर व तालुक्यात किरकोळ कारणावरून हाणामार्‍या ही नित्याची बाब झाली आहे. गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

YouTube video player

दिवसाढवळ्या व्यापारी, व्यावसायिक यांना मारहाण व खंडणीचे प्रकार घडले आहेत. कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न, दुचाकीचे सायलेंसर काढून मोठ्याने होणारे आवाज, कट मारणे, दोन चाकी, चार चाकी वाहनावर नंबर प्लेटवर अनेक प्रकारची नावे दिसून येतात. तरी वाहतूक शाखेचे पोलीस काहीच कारवाई करत नाहीत. व्हाईट कॉलर वाढदिवसाचे औचित्य साधून मोठेमोठे बॅनर लावून दहशत पसरवण्याचा प्रयत्न असे अनेक प्रकार चालू आहेत. सध्या आचारसंहिता असल्याने त्यावर थोडा लगाम आहे.

खर्डा चौक, बीड कॉर्नर, जुने बसस्थानक, नवे बसस्थानक, चौफुला ह्या परिसराचे बॅनरबाजीने विद्रुपीकरण झाले आहे. तसेच जामखेड शहरासह तालुक्यात सावकारकी फोफावली आहे. जामखेड शहर व मोहा हद्दीत असलेल्या कलाकेंद्रावर सातत्याने मारहाणीच्या घटना, गोळीबार अशा अनेक घटना घडल्या आहेत सांस्कृतिक कलाकेंद्राच्या नावाखाली अनेक अवैध व्यवसाय तेथे चालू आहेत. जामखेड चार जिल्ह्यांच्या सिमेवर असल्याने राज्यातील व्हाईट कॉलरवाल्यांचा व गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तेथे थांबता येते. कलाकेंद्र म्हणजे गुन्हेगाराचा अड्डा झाला आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : अस्तित्वाच्या संघर्षात छोटे पक्ष घायाळ

0
नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळविल्याने अनेक छोट्या पक्षांचे अस्तित्वच पुसले गेले आहे. केवळ छोटेच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसारख्या तुलनेने मोठ्या...