Friday, November 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAssembly Election 2024 : दोन राज्यांत विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला; निवडणूक आयोगाकडून...

Assembly Election 2024 : दोन राज्यांत विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला; निवडणूक आयोगाकडून घोषणा

दिल्ली । Delhi

जम्मू आणि काश्मीर (Jammu Kashmir Assembly Elections) व हरियाणा विधानसभा निवडणुकीचा (Haryana Assembly Elections)बिगुल अखेर वाजला आहे.

- Advertisement -

या दोन्ही राज्यात निवडणूकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission Of India) आज करण्यात आली. जम्मू-काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर या तीन टप्प्यात आणि हरियाणामध्ये १ ऑक्टोबरला एका टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. ४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षानंतर प्रथमच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. याआधी २०१४ साली राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तर ९० सदस्य संख्या असलेल्या हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबर रोजी संपणार आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यासंदर्भात ३० सप्टेंबर २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर प्रथमच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. राज्यात ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हटवण्यात आले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या