Friday, December 6, 2024
HomeUncategorizedजम्मू काश्मीरमधील 'दल सरोवर' गोठलं, पाहा फोटो

जम्मू काश्मीरमधील ‘दल सरोवर’ गोठलं, पाहा फोटो

दिल्ली | Delhi

संपूर्ण उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी पडलीय. सर्वात कठीण परिस्थिती जम्मू-काश्मीरमध्ये दिसून येत आहे.

- Advertisement -

जम्मू-काश्मीर किमान तापमान शून्य अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.

जम्मू-काश्मीरच्या विविध भागात सध्या बर्फवृष्टी सुरू असून संपूर्ण काश्मीरवर जणू पांढरी चादर पसरली गेली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांचे आकर्षण असणारा दल तलावही गोठून गेला आहे. गेल्या २९ वर्षांतील हि सर्वात मोठी बर्फवृष्टी मानली जात आहे.

यामुळे येथील दृश्य खूप मनोहारी झाले आहे. दल तलाव गोठल्याने त्यावर उभा राहता येईल अशी येथील अवस्था सध्या झाली आहे..

पण यासोबतच तेथील जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे. श्रीनगरमध्ये कमीतकमी तापमान झाल्याने याठिकाणी पाणीपुरवठा करणारे पाईप्सही गोठले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या