नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू-काश्मीरच्या कूलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तर दोन जवान या चकमकीत जखमी झाले आहेत. या चकमकीनंतर आता सुरक्षा दलांनी या भागात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याचे समजते.
विशेष गुप्तचर माहितीच्या आधारे दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार जवानांनी संशयास्पद हालचाली पाहिल्या होत्या. त्यानंतर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता, ज्याला प्रत्युत्तर म्हणून जवानांनी प्रभावी प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्कराने कुलगाममध्ये संयुक्त कारवाई सुरू केली.
मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील कद्दर भागातील बेहिबाग परिसरामध्ये लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. यावेळी झालेल्या चकमकीमध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र, दहशतवाद्यांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. या चकमकीत दोन जवानही जखमी झाले आहेत.
गुरुवारी सकाळी लष्कर आणि पोलिसांना या परिसरात ४-५ दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम राबवण्यात आली. शोध सुरू असताना दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. लष्करानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती होती.
दोन महिन्यांपूर्वी, २८ ऑक्टोबर रोजी जम्मूच्या अखनूर भागात सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता, त्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात ऑपरेशन सुरू केले. या कारवाईत तीन दहशतवादी मारले गेले. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा सापडला आहे.