नवी दिल्ली | New Delhi
जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुधवारी कर्तव्यावर असताना दच्छन भागातून बेपत्ता झालेल्या दोन स्पेशल पोलीस ऑफिसर्सचे मृतदेह गुरुवारी सकाळी दाट जंगलात आढळून आले आहेत. या दोघांवरही अतिरेक्यांनी गोळीबार केला आहे. हे दोघेही बेपत्ता झाले होते म्हणून त्यांचा शोध सुरू होता. दहशतवाद्यांनी या दोन्ही जवानांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे.
ड्युटीवर जाताना झाले होते बेपत्ता
मिळालेल्या माहितीनुसार, किश्तवाड जिल्ह्यातील दुर्गम दच्छन परिसरात तैनात असलेले दोन विशेष पोलीस अधिकारी बुधवारी बेपत्ता झाले होते. ते कियार गावातील विशेष ऑपरेशन ग्रुपशी (SOG) संबंधित होते. लष्कराच्या धारणा-मरवाह येथील पोस्टवर ड्युटी रोटेशनसाठी जात असताना त्यांचा संपर्क तुटला. दोन्ही अधिकारी नियोजित ठिकाणी पोहोचले नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस आणि सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली. जंगलांनी वेढलेला आणि डोंगराळ भूभाग असल्याने शोधकार्यात अडचणी येत होत्या. अखेर गुरुवारी शोधपथकाला ज्या ठिकाणाहून ते बेपत्ता झाले होते तेथून सुमारे २ किलोमीटर अंतरावर दच्छनच्या जंगलात त्यांचे मृतदेह सापडले. दोन्ही जवानांच्या शरीरावर गोळ्यांच्या अनेक खुणा आढळून आल्या आहेत. एकाच्या डोक्यात तर दुसऱ्याच्या पाठीवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
#WATCH | Kishtwar, J&K | Mortal remains of two missing SPOs recovered in Kishtwar. BJP MLA from Kishtwar, Shagun Parihar, says, A truly tragic incident has occurred. Two of our SPOs have been killed. They had been reported missing last night, and their bodies were recovered this morning. One body was found around 8 am, and the second was recovered around 9 am It is deeply tragic. Pakistan continues to persist with its nefarious conspiracies. We urge the Home Minister to ensure that those responsible for the deaths of these two SPOs are held to account immediately. We demand that, for these two lives, a response of fourfold magnitude be given. I am leaving for the area shortly.”— ANI (@ANI) November 12, 2026
दोन्ही अधिकाऱ्यांची ओळख पटली
मृत अधिकाऱ्यांची नावे बाबी चंद (वय ५७) आणि रशपाल कुमार (वय ४५) अशी आहे. दोघेही किश्तवाडमधील कियार-डच्छन परिसरातील रहिवासी होते. प्राथमिक माहितीनुसार, दोघांच्या शरीरावर गोळ्यांच्या जखमा आढळल्या आहेत. त्यांच्याकडे असलेली सेवा शस्त्रे मात्र घटनास्थळी मिळालेली नाहीत. त्यामुळे हत्या केल्यानंतर हल्लेखोरांनी रायफल्स पळवून नेली असावीत, असा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; रब्बी हंगामातील खतांच्या खरेदीसाठी ६२,३७० कोटींचं अनुदान मंजूर
कुलगाममध्येही सीआरपीएफ जवानांवर गोळीबार
या घटनेच्या काही तास आधी बुधवारी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील मीर बाजारजवळ अखरान परिसरात सीआरपीएफच्या सुरक्षा नाक्यावर हल्ला झाला होता. दोन हल्लेखोरांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला. या घटनेत तीन सीआरपीएफ जवान जखमी झाले आहे. या हल्ल्यानंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. त्यानंतर आता किश्तवाडमध्ये दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे मृतदेह आढळल्याने जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थिती पुन्हा चर्चेत आली आहे.




