Monday, June 24, 2024
Homeनाशिकजनलक्ष्मी बँक सुवर्ण महोत्सवी वर्षात सभासदांंना भरघोस भेट देणार

जनलक्ष्मी बँक सुवर्ण महोत्सवी वर्षात सभासदांंना भरघोस भेट देणार

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

जनलक्ष्मी सहकारी बँक आगामी काळात सुवर्ण महोत्सवी वर्षात सभासदांंना भरघोस भेट देईल. असा मानस आज ४८ व्या वार्षीक सभेत व्यक्त करण्यात आला. बँंकेची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत झाली.

जानी म्हणाले, बँंकेने ग्राहकांना विविध सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. बँकेने अहवाल वर्षात प्रगती साधली आहे. बँकेने खर्च कमी करणसाठी पाच शाखाांंचे विलीणीकरण केले आहे.

यावेळी झालेल्या चर्चत बँकच्या प्रगतीची माहीती देण्यात आली. ठेवी १७७ कोटी ६८ लाख आहेत. ८२ कोटी ७० लाख रुपयांचे कर्जवाटप केले असून, बँकेचा राखीव निधी १०५ कोटी ८१ लाख आहे. बँकेचा संंचीत तोटा १० कोटी ९२ लाख रुपये होता. अहवाल वर्षात बँकेला २ कोटी १५ लाखाचा तोटा असुन संचीत तोटा १३ कोटी सात लाख झाला आहे. कर्ज वसुली या वर्षी ५ कोटी १६ लाख रुपेय झाली आहे. ३१ कोटी ९८ लाखाची थकबाकी आहे.

जाणीवपूर्वक कर्ज न भरणाऱ्या थकबाकीदारांवर विविध कायद्यांंतर्गत कडक कारवाई करण्यात आल्याचे यावेेळी सांगितले. बँकेत आरटीजीएस व एनईएफटी सुविधा उपलब्ध झाली आहे. प्रत्येक शाखेचा आयएफएससी कोड प्राप्त झाला आहे. तसेच बँकेचे सीटीएस क्लिअरिंग कामकाजही सुरू झालेले आहे. अडीच कोटी रुपये ऑपरेटींग चार्जेस मधुन मिळाले आहे.

खातेदार, ठेवीदार व ग्राहक यांंनी बँकेस सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी अध्यक्ष भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष समीर कांबळे आणि संचालक मंडळाने केले. माजी आमदार बाळासाहेब सानप, शरद केाशीरे, रावसाहेब कोशिरे, उध्दव निमसे, प्रमोद पुराणीक आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

उपाध्यक्ष समीर कांबळे, संचालक जयंत जानी, उत्तमराव उगले,सतीश सोनवणे, शरद गांंंगुर्डे, सागर कांंबळे, संजय पाटील, आनंद कारवा, जितेंद्र सामंत, महेंद्र बच्छाव, शालीनी डुंबरे, स्वप्ना निंबाळकर, श्रीकांंत रहाळकर रविंद्र्र अमृतकर, व्यवस्थापन मंडळाचे संतोष कासार, सुरेश पाटील, मिलींंद पोफळे, मुख्य अधीकारी अजीत मांडगावणे उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या