Tuesday, May 7, 2024
Homeनाशिकजनता की बात : प्रभाग 10 मध्ये क्रीडांगणाची अपेक्षा

जनता की बात : प्रभाग 10 मध्ये क्रीडांगणाची अपेक्षा

सातपूर | रवींद्र केडिया Satpur

प्रभाग 10 Ward no 10 मध्ये नागरिकांना क्रीडांगण , जीम, दर्जेदार रस्त्यांची अपेक्षा Expect playgrounds, gyms, quality roads आहे. या भागात तरुणाईला खेळायला जागा नसल्याने ते मोबाईलच्या खेळात व्यस्थ होत आहेत. त्यांना मैदान उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

- Advertisement -

अशोकनगर भाजीबाजारात सुविधा निर्माण व्हाव्यात. भाजीबाजारात शौचालय नसल्याने महिला व्यावसायिक व ग्राहकांची मोठी अडचण निर्माण होत आहे. हा प्रश्न गंभीर आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. ओटे बांधलेले आहेत मात्र त्यावरचे पत्रे खराब झालेले आहेत. त्यामुळे ओटे सुधारावेत. शेड मोठी करून दुरूस्त करावी, बाहेरील बाजूला पार्किंगची सोय करावी. मार्केटच्या आत चोहोबाजूला ओटे बांधावेत. पार्किंगची जागा मोकळी ठेवावी.

विष्णू गामणे

प्रभागातील युवा व बालकांना खेळण्यासाठी मैदानच उपलब्ध नाही. ही सामाजिक गरज लक्षात घेऊन क्रीडांगण उभारावे. अद्ययावत जीम नाही. ती बनवण्यात यावी. ग्रीन जीमकडे लक्ष दिले जात नाही. रस्त्याची कामे चांगली नाहीत. अंबिका चौफुलीवर दुभाजक टाकण्यात आलेला आहे. तो धोकादायक असून या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. जनसामान्यांना हानी पोहोचणार नाही अशी कामे होणे अपेक्षित आहेत.

सत्यजित सांबरे

अशोकनगरमधील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. दुभाजकाचे काम अतिशय संंथ गतीने चालले आहे. त्यामुळे नागरिकांची अडचण होत आहे. मुलांना खेळण्यासाठी सोय नसल्यामुळे अडचण होते. प्रभाग 10 मधील लोकसंख्येचा विचार करून या ठिकाणी तरण तलाव उभारावा.

योगेश बेदाडे

अशोकनगर भागातील मोकळ्या भूखंडांना तार कंपाऊंड करण्यात यावे. त्या ठिकाणांवर विशेष लक्ष द्यावे. अनेक ठिकाणी घरातील केर कचरा, मृत जनावरे टाकली जातात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत जेणेकरून भुरट्या चोर्‍यांना आळा बसेल.

स्वप्निल वडनेरे

- Advertisment -

ताज्या बातम्या