Saturday, September 12, 2026
Homeदेश विदेशJapan Tusami Alert: जपानला शक्तिशाली ७.४ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का; सुनामीचा दिला...

Japan Tusami Alert: जपानला शक्तिशाली ७.४ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का; सुनामीचा दिला अलर्ट

टोकियो | Tokyo
जपानच्या उत्तरीय भागात सायंकाळी ४:५३ वाजता ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. जपान हवामान खात्याने तात्काळ इवाते, आओमोरी आणि होक्काइडो प्रांतातील किनारपट्टी भागासाठी सुनामीचा इशारा जारी केला आहे. इवाते प्रांत आणि होक्काइडोच्या काही भागांमध्ये ३ मीटर उंचीपर्यंतच्या लाटा पोहोचू शकतात. लोकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टोकियोमध्येही हादरे
भूकंपाचे हादरे इतके तीव्र होते की, शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या टोकियोमधील उंच इमारतीही हादरल्या. भुकंपानंतर सुनामीच्या लाटा वारंवार किनारपट्टीला धडकू शकतात, त्यामुळे धोका पूर्णपणे टळेपर्यंत किनारपट्टीवर किंवा नद्यांच्या जवळ जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

- Advertisement -

IPL 2026 : आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये मुकाबला; MI ला विजय अनिवार्य

नदी किनाऱ्यापासून लांब राहण्याचा दिला इशारा
असेही सांगितले जात आहे की, लाटा अपेक्षेपेक्षा लवकर किंवा उशिरा येऊ शकतात आणि त्यांची उंचीही अपेक्षेपेक्षा जास्त असू शकते. समुद्रकिनारे आणि नद्यांजवळ राहणाऱ्या रहिवाशांना दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण पाण्याची पातळी अचानक वाढून परिसरात पुरासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने या संकटाचा सामना करण्यासाठी तातडीने आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित केला आहे. २०११ मध्ये जपानमध्ये आलेल्या ९.० तीव्रतेच्या भूकंपाच्या आठवणी या घटनेने ताज्या झाल्या आहेत, ज्यामध्ये १८,५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

ताज्या बातम्या

आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहण नियोजनाची बैठक; माजी महापौर आणि आयुक्तांमध्ये शाब्दिक...

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या धर्म ध्वजारोहण आणि ग्राम परिक्रमेच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी (दि.१२) श्री शुक्ल यजूर्वेदिय ब्राह्मण संस्थेत रामसेतू पुलाजवळ बैठक आयोजित करण्यात...