Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजLoksabha Election 2024 : जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

Loksabha Election 2024 : जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

काय झाली चर्चा?

मुंबई | Mumbai

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) वारे वाहत सुरु असून सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार चालू आहे. यात अनेक नेतेमंडळी मतदारांच्या भेटीगाठी देखील घेत आहेत. अशातच आता राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लोकसभेची लढाई म्हणून समजल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघाच्या (Baramati Loksabha) उमेदवार सुनेत्रा पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव जय पवार यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीच्या चर्चांनी उधाण आले आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी जय पवार हे मुंबईतून हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगरला आले होते. यानंतर त्याठिकाणाहून जय पवार (Jay Pawar) हे कुणलाही न कळवता थेट कारने अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले होते. याठिकाणी जय पवार यांनी अर्धा तास वाट बघितल्यानंतर त्यांची मनोज जरांगेंशी (Manoj Jarange) भेट झाली. यावेळी दोघांनी एकमेकांचे स्वागत केले. यावेळी जय पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण देखील उपस्थित होते. त्यामुळे मनोज जरांगे आणि जय पवार यांच्यामध्ये राजकीय विषयावर चर्चा तर झाली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

YouTube video player

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुकारलेल्या आंदोलनामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. त्यानंतर जरांगे यांनी आमरण उपोषण करत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadanvis Government) जेरीस आणले होते. अखेर राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून स्वतंत्र मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर केला होता. मात्र, जरांगेंनी ओबीसीतून आरक्षणाची (OBC Reservation) मागणी लावून धरली होती.

ताज्या बातम्या

पडसाद : अस्तित्वाच्या संघर्षात छोटे पक्ष घायाळ

0
नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळविल्याने अनेक छोट्या पक्षांचे अस्तित्वच पुसले गेले आहे. केवळ छोटेच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसारख्या तुलनेने मोठ्या...