Tuesday, March 25, 2025
Homeनगरजय पवार यांच्या दौर्‍यानंतर कर्जत भाजप अस्वस्थ

जय पवार यांच्या दौर्‍यानंतर कर्जत भाजप अस्वस्थ

चाचपणी अगोदरच अनेक अडथळे तयार

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी तालुक्यात दौरा केला. मात्र, या दौर्‍यांनतर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अनेकांनी कर्जत-जामखेड मतदारसंघ हा भाजपचा असून याठिकाणी येऊन राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यावतीने चाचपणी करणे कार्यकर्त्यांना आवडलेले नाही, अशी प्रतिक्रिया भाजपच्यावतीने व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या जय पवार यांच्या विरोधात आतापासून अडथळे तयार होण्यास सुरूवात झाली आहे.

- Advertisement -

जय पवार यांनी कर्जत तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी महायुतीतील काही पदाधिकार्‍यांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्या. या दौर्‍याच्यानिमित्ताने त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी देखील केली. तसेच इतर पक्षातील काहीजणांना त्यांनी अजित पवार गटांमध्ये येण्याची देखील ऑफर दिली आहे. या दौर्‍यामध्ये आ. रोहित पवार यांच्यावर नाराज असणार्‍या काहीजणांची त्यांनी आवर्जून गाठीभेटी देखील घेतल्या. रोहित पवार यांच्या विरोधात कर्जत-जामखेड मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी देखील केली आणि हे आता लपून राहिले नाही. या मतदारसंघात 2019 चा अपवाद वगळता सलग 25 वर्षे भाजपचा आमदार विजयी झाला आहे.

यामुळे आजही या मतदारसंघावर भाजपची पकड आहे. विविध संस्था, ग्रामपंचायती यावर भाजपचे वर्चस्व आहे. आ. पवार हे विजयी झाल्यानंतरही कृषी कृषी उत्पन्न बाजार समितीसह अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपने यश मिळवले. यामुळे आजही भाजपची मतदारसंघातील ताकद कमी झाली नसून त्यामध्ये उलट वाढ झाली असल्याचा दावा भाजपचे कार्यकर्ते करत आहेत. यामुळे जय पवार अथवा त्यांच्या कुटूंबातील व्यक्तीला आमचा विरोध राहील. प्रसंगी विरोधकांचे काम करू, मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराचे काम करणार नाही. कर्जत-जामखेडमधून रोहित पवार यांना पुन्हा माघारी पाठवण्याची तयारी करत असताना आता दुसरा पवार मतदारसंघांमध्ये नको, अशी भूमिका घेताना दिसत आहे.

स्वः गटातही नाराजी
अंबालिका कारखाना अजित पवार यांनी घेतला. मात्र हा कारखाना घेण्यासाठी ज्यांनी विरोध केला, त्यांच्याच घरी जाऊन पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या आधी जय पवार यांनी भेट घेतल्यामुळे पक्षांतर्गत देखील नाराजी निर्माण झाली आहे. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सर्वप्रथम किंमत मिळावी, अशी चर्चा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सुरू असल्याचे पाहावयास मिळाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...